औरंगाबाद : व्हिजन डॉक्युमेंटस्नुसार २०२० मध्ये ५० लाख पर्यटक शहराला भेट देतील, असा अंदाज आहे. त्यामुळे पर्यटन वृद्धीस चालना देणारे उपक्रम राबविले जावेत, असे मत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केले.शहराला ऐतिहासिकतेची मोठी झालर आहे. वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद येथे लेण्या आहेत. त्यामुळे पर्यटक येण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या पर्यटक दीड दिवस या शहरात घालवितो. आगामी काळात हे प्रमाण अडीच दिवस इतके झाले तर शहरात पर्यटनातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, असेही तेम्हणाले. मलिक अंबरकालीन ऐतिहासिक कमल तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी शासनाने डीपीडीसीमार्फत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्या कामाचे भूमिपूजन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते आज झाले. यावेळी महापौर कला ओझा, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सिकंदर अली, कृउबासचे माजी सभापती पंकज फुलपगर, राधाकृष्ण गायकवाड आदींची उपस्थिती होती. शिक्षणमंत्री म्हणाले, मलिक अंबरने पिण्याच्या पाण्यापासून दळणापर्यंतची व्यवस्था निर्माण केली होती.कमल तलावाच्या परिसरातच कॅन्सर हॉस्पिटल, आमखास मैदानसारखा परिसर आहे. पर्यटकांसाठी दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्राम बांधले. रेल्वेस्टेशन, हर्सूल येथून दोन बसेस सुरू झाल्या पाहिजेत. यातून संपूर्ण औरंगाबाद दर्शन पर्यटकांना झाले पाहिजे. महापौर म्हणाल्या, डीपीडीसीच्या माध्यमातून निधी मिळाला आहे. तलावाचे सुशोभीकरण झाल्यावर नागरिकांना त्याची काळजी घ्यावी लागेल. प्रास्ताविक करताना आयुक्त डॉ.कांबळे म्हणाले, विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी येथे ऐतिहासिक कमल तलाव असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनीही तातडीने संवर्धनासाठी प्रस्ताव तयार केला. निधी मिळाल्यास मनपा सुशोभीकरणास तयार होईल. सलीम अली सरोवरातील ओव्हरफ्लो होणारे पाणी या तलावात यायचे. तेथे कमळ उगवायचे. ४०० वर्षांपूर्वीच्या त्या इतिहासाचे सध्याचे वास्तव वेगळे आहे.रोझ गार्डन, बॉटनिकल गार्डन, सलीम अली सरोवर हे विरंगुळ्याची ठिकाणे मनपाने विकसित केली आहेत. बॉटनिकल गार्डनसाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मोठा निधी दिला असून, त्यातून मुलांसाठी मिनीट्रेन बसविण्याचे काम सुरू आहे. उपअभियंता के. आर. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकेले. कमल तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी १ कोटी रुपये मंजूर झाले असून, ५० लाखांचा पहिला टप्पा प्राप्त झाला आहे. यातून तलावाची साफसफाई करणे, पाण्याचा प्रवाह मोकळा करणे, गाळ काढणे, सुरक्षक भिंत बांधणे, उद्यान विकसित करणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, आसन व्यवस्था करणे, विद्युत यंत्रणा व रंगरंगोटी करणे.४दुसऱ्या टप्प्यात सुरक्षक भिंत बांधणे, अंडरग्राऊंड पाण्याची टाकी बांधणे, प्लंबिंगचे काम करणे, ड्रेनेज वॉटर रिसायकल करणे, कारंजी बसविणे.
पर्यटनास चालना देणारे उपक्रम व्हावेत
By admin | Updated: August 29, 2014 01:32 IST