रेणापूर : मोटेगाव येथे शेत जमीन पेरणीच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ परस्परविरोधी फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द जातीवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी तर इतर सोळा जणांविरुध्द महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळविल्याचा गुन्हा रविवारी रेणापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़तालुक्यातील मोटेगाव येथे शेत जमीन पेरणीच्या कारणावरुन रविवारी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली़ याप्रकरणी मारुती कसबे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील विनायक सोमवंशी, मिराबाई सोमवंशी, सुरेखा सोमवंशी, दत्ता सोमवंशी, सोपान सोमवंशी आदींनी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास मागासवर्गीय वस्तीत येऊन आमच्या जमीनीवर का आलास या कारणावरुन जातीवाच शिविगाळ केली़ या सर्वांनी संगनमत करुन काठीने, लाथाबुक्क्यांनी आणि तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन जखमी केले़ तसेच अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ या फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच मिराबाई सोमवंशी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जमिनीच्या कारणावरुन १६ व्यक्तींनी मारहाण करुन जखमी केले़ त्यांच्या फिर्यादीवरुन मोहन कसबे, चंद्रकांत सोमवंशी, मनोहर कसबे, मारुती कसबे, दत्तू कसबे, किशोर कसबे, बाबुराव कसबे, साहेबराव कसबे, वैजनाथ सोमवंशी, मनीषा कसबे, ज्योती कसबे, मीराबाई वाघमारे, अयोध्या कसबे, चंचला सोमवंशी, इदुंबाई कसबे, साहेब कसबे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
पेरणीवरून तुंबळ हाणामारी
By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST