शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भावी शिक्षकाकडून बारावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:10 IST

वैजापूर तालुक्यातील घटना : अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी

वैजापूर : अश्लील छायाचित्र व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन तरुणीवर भावी शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे घडली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस शनिवारी अटक करण्यात आली आहे.परसराम मन्साराम बिघोत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी ही संजरपूरवाडी (ता.वैजापूर) येथील रहिवासी असून, ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. बिघोतची सदर तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर तो तिची छेडछाड करत होता. तरुणीने याबाबत घरी सांगण्याची धमकी देऊन विरोध केल्यावरसुद्धा त्याने माझ्यासोबत फोटो काढ नाही तर तुझे आई-वडील व भावाचा काटा काढेन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने फोटो काढले. मात्र, त्यानंतर हे फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने ८ फेब्रुवारी रोजी तरुणी महाविद्यालयात आली असताना तिला धमकावत नालेगाव येथील मित्राच्या घरी नेऊन बळजबरीने अत्याचार केला, अशी तक्रार पीडित तरुणीने शनिवारी दिली आहे.यावरून वैजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील अधिक पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. भगवान डांगे करत आहेत.चौकट...आरोपी बदनापुरात घेत आहे बीपीएडचे शिक्षणआरोपी शिक्षक परसराम बिघोत हा जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे बीपीएडचे शिक्षण घेत असून, त्याची राज्य स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच आरोपीला पकडण्यासाठी सपोनि. भगवान डांगे, पोना. मोईज बेग, पोकॉ. विठ्ठल जाधव हे संजरपूरवाडी व नालेगाव येथे गेले होते. मात्र, आरोपी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी वैजापूर येथे आल्याचे कळताच पोलिसांनी शहरात दोन तास तपास करून त्याला अटक केली.

टॅग्स :Policeपोलिस