लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा रुग्णालयासह परिसरातील वीज पुरवठा तांत्रिक कारणामुळे खंडित करण्यात आला होता. परंतु पर्यायी व्यवस्था नसल्याने रुग्णालयात सर्वत्र अंधार पसरला होता. खंडित विजेमुळे कार्यालयीन कामकाज खोळंबण्याबरोबरच रुग्ण, अपंगांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मोबाईलच्या टॉर्चवर रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. यानिनिमित्ताने जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.जिल्हा रुग्णालयात १२ वॉर्डमध्ये ३२० खाटा आहेत. प्रत्यक्षात येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या खाटांपेक्षा तिप्पट आहे. अशीच परिस्थिती बाह्यरुग्ण विभागाचीही आहे. दररोज दोन हजाराच्यावर रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. तसेच सोनोग्राफी, एक्स-रे करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मागील काही वर्षांपासून सर्व कारभार आॅनलाईन झाला आहे. परंतु संगणक बंद असल्याने कार्यालयीन कामकाजही खोळंबले होते. सर्व कर्मचारी वीजेची प्रतीक्षा करीत बसल्याचे पहावयास मिळाले.पर्यायी व्यवस्थाच नाही!जिल्हा रूग्णालयातील वीज गायब झाल्यावर येथे जनरेटर असणे आवश्यक होते. रूग्णालयात कोणत्याही वेळेला कोणत्याही आजाराचा रूग्ण दाखल होत असतो. परंतु सुविधा मिळत नसल्याने रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनाही अडचणी येत आहेत. वीजेची प्रतीक्षा करीत त्यांना बसावे लागते. दुसऱ्या बाजूला मात्र रूग्णाला वेदना सहन कराव्या लागत आहेत.
टॉर्चवर ‘उपचार’
By admin | Updated: July 13, 2017 00:45 IST