शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
3
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
4
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
5
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
6
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
7
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
8
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
9
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
10
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
11
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
12
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
13
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
14
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
15
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
16
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
17
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
18
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
19
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
20
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण करून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:35 IST

महाविद्यालयात शिकत असताना काढलेले फोटो परत देण्याच्या बहाण्यातून विवाहित तरुणीला बोलावून, चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्यानंतर खोलीत डांबून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध अत्याचारासह अपहारणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल संतोष थिटे असे या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देसिडको ठाण्यात गुन्हा दाखल : खोलीत डांबून तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार आला समोर

औरंगाबाद : महाविद्यालयात शिकत असताना काढलेले फोटो परत देण्याच्या बहाण्यातून विवाहित तरुणीला बोलावून, चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्यानंतर खोलीत डांबून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध अत्याचारासह अपहारणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल संतोष थिटे असे या आरोपीचे नाव आहे.सदर विवाहिता (२०) एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकेदिवशी मित्र-मैत्रिणींसह विद्यापीठ परिसरात फिरायला गेले होते. त्यामध्ये अमोल संतोष थिटे हाही होता. त्या ठिकाणी त्या तरुणीचे जीन्स पॅन्ट आणि टॉपवर काही वैयक्तिक फोटो त्याने काढले. काढलेले फोटो देण्याची मागणी या तरुणीकडून अमोलकडे केली जात होती; परंतु तो देण्यास टाळाटाळ करीत होता. मे २०१८ मध्ये या तरुणीचा शहरातील एका तरुणाबरोबर विवाह झाला. विवाहानंतर तरुणीने अमोलकडे फोटो देण्याची मागणी केली; परंतु पुन्हा टाळाटाळ झाल्याने तरुणीने अमोलला शिवीगाळ केली होती.फोटो कारमध्ये ठेवल्याचे सांगून लावला चाकू८ मार्च २०१९ रोजी अमोलने या तरुणीला कॅनॉट भागातील एका दुकानासमोर फोटो घेण्यास बोलावले. त्यानुसार सकाळी ११ वाजता तरुणी त्या ठिकाणी पोहोचली. फोटो कारमध्ये ठेवले आहेत असे म्हणून अमोलने तरुणीला कारकडे नेले. त्या ठिकाणी चाकूचा धाक दाखवीत कारमध्ये बळजबरीने बसविले. चालकाने कार थेट वाशिमला नेली. त्या ठिकाणी अमोलने तरुणीला एका खोलीत कोंडून एक महिना अत्याचार केला.तरुणीचा शोध घेत चुलत मामा वाशिम येथे दाखल झाला. त्याने तरुणीला सोबत घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले. तरुणीची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर वडिलांनी तिला सासरी आणून सोडले. सासरच्या मंडळींना घडलेली हकीकत सांगितल्यानेतर त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून अमोल थिटे याच्या विरोधात अत्याचार, अपहारण, धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अमोलला मदत करणाऱ्या अफसर शाहलाही सहआरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाचोळे करीत आहेत.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी