शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

टोमॅटो फेकले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:12 IST

अवघ्या २ ते ४ रुपये किलोनेही विक्री न झालेले टोमॅटो अखेर शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिले. सर्वत्र वाढलेली आवक आणि त्यात उठावही नसल्याने मातीमोल भावात टोमॅटो विकल्या जात आहेत. फेकलेल्या टोमॅटोंवर गायी, म्हशींनी मनसोक्त ताव मारला.

ठळक मुद्देमातीमोल भाव : जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार

औरंगाबाद : अवघ्या २ ते ४ रुपये किलोनेही विक्री न झालेले टोमॅटो अखेर शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिले. सर्वत्र वाढलेली आवक आणि त्यात उठावही नसल्याने मातीमोल भावात टोमॅटो विकल्या जात आहेत. फेकलेल्या टोमॅटोंवर गायी, म्हशींनी मनसोक्त ताव मारला.सध्याचे वातावरण टोमॅटोंसाठी पोषक आहे. यामुळे टोमॅटोंचे विक्रमी उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात चोहोबाजूने टोमॅटोंची जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होत आहे. कृउबाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे १८ टन टोमॅटोंची आवक झाली. होलसेल व्यवहारात २०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भावात टोमॅटो विक्री झाले. अडत व्यापाºयांनी सांगितले की, २० किलो टोमॅटो २० ते ५० रुपयांना विक्री झाले. या भावातही मागणी नव्हती. सर्वत्र टोमॅटोच दिसत होते. उन्हामुळे टोमॅटो लवकर खराब होतात. अखरे शिल्लक राहिलेलेले टोमॅटो रस्त्यावरच फेकून देऊन शेतकरी घरी निघून गेले. दुपारी १ वाजेदरम्यान जाधववाडीत अनेक ठिकाणी टोमॅटोंचे ढीगच्या ढीग दिसून आले. त्यावर शेकडो गायी, म्हशींनी मनसोक्त ताव मारला. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व टोमॅटो जनावरांनी फस्त केले होते. विशेष म्हणजे अडत बाजारात २ ते ४ रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो हातगाडीवाले गल्लोगल्ली १५ रुपये किलोने विकत होते, तर स्वच्छ व धुतलेले हेच टोमॅटो भाजीमंडीत १५ ते २० रुपये किलोने विकले जात होते. यात शेतकºयांना व ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.शंकर जोगदंड या शेतकºयाने सांगितले की, मातीमोल भावात टोमॅटो विकत असल्याने शेतातून काढून जाधववाडीत विक्रीसाठी आणणेही परवडत नाही. काही व्यापारी अपप्रचार करतात की, हलक्या प्रतीचे टोमॅटो फेकून दिले; पण तसे नाही. तेच टोमॅटो हे व्यापारी भाजीमंडीत महागड्या दराने विकत आहेत.चौकटमध्यप्रदेशातील लसूणमागील वर्षी १०० रुपये किलोपर्यंत विक्री झालेला लसूण सध्या अडत बाजारात ५ ते १५ रुपये किलोने विकला जात आहे. मध्यप्रदेशात लसणाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात लसूण बाजारात विक्रीला येत आहे.कॅप्शन१) शेतकºयांनी फेकून दिलेल्या टोमॅटोंवर गायी, म्हशींनी असा ताव मारला.२) मध्यप्रदेशातील लसूण विक्रीविना दुकानात थप्पीच्या थप्पी पडून होता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेती