लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ५३ टक्के शौचालये पूर्ण झाली असून अद्याप सुमारे ३ लाख १६ हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट शिल्लक आहे़ सदर बांधकामाना वेग देण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत नेहरु युवा केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, स्वयंसेवी संस्था आदी घटकांना सहभाग घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची बैठक ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कक्षात घेतली़ यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपमुख्यकार्यकारी अधिकारी जी. एल. रामोड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, संनियंत्रण व मूल्यांकन सल्लागार प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.मार्च २०१८ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. यात शौचालय बांधकामाचे सर्वाधिक उद्दिष्ट नांदेड जिल्ह्याचे आहे. दोन लाख शौचालय बांधकामासाठी माहिती शिक्षण व संवादाचे उपक्रम राबवून नेहरु युवा केंद्राचे युवाकर्मी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक, विविध महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंप्रेरणेने काम करणारे स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, महिला बचतगट, शिक्षक, पंचायत समितीस्तरावरील सर्व खातेप्रमुख, महसूल व पोलीस विभागातील कर्मचारी अशा विविध यंत्रणांनाही शौचालय बांधकामाच्या मोहिमेत सहभागी करुन घेतले जाणार आहे.जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाला अग्रक्रम दिला असून खातेप्रमुखांना दत्तक दिलेल्या तालुक्यातील गावे हागणदारीमुक्त होण्यासाठी वेळोवेळी भेटी देऊन गावे स्वच्छ व निर्मल करावीत अशा सूचना दिल्या.
उद्दिष्टपूर्तीसाठी शौचालय बांधकामांना मिळणार गती
By admin | Updated: July 8, 2017 00:28 IST