लातूर : विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे, भारत संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) येथे विश्वधर्मी श्रीराम-रहिम मानवता सेतू या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून त्याचे लोकार्पण मंगळवारी सकाळी ९ वा. रामेश्वर (रूई) येथे होणार आहे. यावेळी पद्मभूषण डॉ. विजय भटकर, स्वामी गोविंद देव गिरी महाराज, आचार्य किशोरजी व्यास, डॉ. राजेंद्र शेंडे, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. वेद प्रताप वैदिक, माजी केंद्रीय मंत्री डॉ. आरिफ महम्मद खान, फिरोज बख्त अहमद, खासदार डॉ. सुनील गायकवाड, गोपाळराव पाटील, अॅड. सिराज कुरेशी, डॉ. अशोक कुकडे यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण व रमेशअप्पा कराड यांनी दिली.
मानवता सेतूचे आज लोकार्पण
By admin | Updated: April 3, 2017 22:44 IST