शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

आजचे राशीभविष्य दि. 30 नोव्हेंबर 2020 डॉ. मनीषा देशपांडे औरंगाबाद

By | Updated: December 2, 2020 04:04 IST

सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२० राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन ९ , १९४२. तिथी : कार्तिक शुक्ल पौर्णिमा. श्री ...

सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२०

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायन ९ , १९४२. तिथी : कार्तिक शुक्ल पौर्णिमा. श्री शालिवाहन शके १९४२. शार्वरी नाम संवत्सर. नक्षत्र: रोहिणी. रास: वृषभ. आज: चांगला दिवस. कार्तिक स्नान समाप्ती. तुळशी विवाह समाप्ती. श्री गुरु नानकदेव जयंती. राहू काळ: सकाळी ७:३० ते ९ (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा)

.........................................

मेष :

बरेच दिवस आपण वाट पाहत असलेला क्षण आला आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. शिक्षण क्षेत्रात काम करीत असाल तर प्रशिक्षण घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होईल.

वृषभ :

दिवस मजेत जाईल. कामाचा ताण हलका होईल. स्वतःसाठी काही खरेदी कराल. व्यवसायात काहीशी मंदी जाणवेल. पण आवश्यक ते बदल केले तर निश्चितच फरक पडेल.

मिथुन :

बरीच राहिलेली कामे आज पूर्ण करावी लागतील. घर आणि काम यांची सांगड घालावी लागेल. वेळापत्रक आखून कामे करा. कागदपत्रावर न वाचता सही करू नका. खात्री करूनच सही करा.

कर्क :

मुलांबरोबर वेळ घालवाल. त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. कामाचा ताण बराच कमी होईल. त्यामुळे बाकी कामे पूर्ण करता येतील. व्यवसायात पैसे वसूल करता येतील.

सिंह :

आपल्यात बदल करावा लागेल. परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदला. म्हणजे तुमचा उद्देश पूर्ण होईल. गरज पडल्यास मोठ्यांचा सल्ला घ्या. मुलांना आनंदी दिवस असेल.

कन्या :

योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण जाईल. तुमचा जर पर्यटनाचा व्यवसाय असेल तर त्याला बऱ्यापैकी वेग मिळेल. नवीन काम मिळाल्यामुळे आपण खूश असाल.

तुळ:

जवळच्या लोकांचा मानसिक आधार मिळेल. त्यामुळे आपली काळजी दूर होईल. काहींना घरून आर्थिक मदत पण मिळू शकेल. अतिउत्साहात स्वतःकडे नीट लक्ष दिले नाही तर तब्येतीच्या तक्रारी चालू होतील.

वृश्चिक :

तुम्ही मंगल कार्यात भाग घ्याल किंवा तसे निमंत्रण येईल. नवरा-बायकोतील वाद कमी होतील. भागीदारी व्यवसाय लाभ मिळवून देतील. इतर व्यवसायांना सामान्य दिवस असेल.

धनु :

नोकरीच्या शोधात असाल तर कॉल येईल. तसेच नोकरीत बदल करू इच्छित असाल तसे प्रयत्न सुरू ठेवावेत. आईशी वाद होण्याची शक्यता आहे. कामे सांभाळून करा. दुखापत होऊ शकते.

मकर :

काही विशेष उद्देशाने काम करीत असाल तर आज त्यात यश नक्की मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आपण आनंदी व्हाल. मुलांच्या मदतीने भविष्याचे आर्थिक नियोजन केले तर चांगले राहील.

कुंभ :

घरातील वाद कमी होतील. गैरसमज दूर होतील. नवीन खरेदीचे बेत ठरतील. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना घरून आधार मिळेल. त्यामुळे पूर्ण विश्वासाने कामाला सुरुवात करता येईल.

मीन :

मित्रांच्या मदतीला धावून जावे लागेल. घरात घाईगडबडीचे वातावरण राहील. नोकरीत सहकारी मित्रांची मदत मिळेल. त्यामुळे काम सोपे होईल. पैशाचे व्यवहार मात्र जरा जपूनच करा.