शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड

By admin | Updated: May 22, 2015 00:33 IST

लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. बँकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया होणार आहे.

लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. बँकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या अर्जांची स्वीकृती व छाननीसाठी १५ मिनिटांचा वेळ आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर अंतिम उमेदवारांत मतदान होईल. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे १९ पैकी १८ उमेदवार निवडून आले आहेत. रमेश कराड भाजपाचे एकमेव संचालक आहेत. त्यामुळे बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. संचालक मंडळात एकूण ११ जुने चेहरे आहेत. जुन्यांना संधी मिळते की, नव्या संचालकांची वर्णी लागते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात या संचालकांतून नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार आहे. बरोबर सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी ए.एच. घोलकर इच्छुकांचे अर्ज स्वीकारतील. अर्ज दिल्यानंतर १५ मिनिटांचा वेळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील १५ मिनिटांत प्राप्त अर्जांची छाननी होईल. वैध अर्जांतून अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला प्रारंभ होईल. दुपारी १२.३० वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए.एच. घोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, नेमकी कोणाची या पदांवर वर्णी लागते, हे शुक्रवारी सकाळी ११ वाजताच कळणार आहे.