शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून छठपूजा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:34 IST

मंगळवारपासून छठपूजा उत्सवाला सुरुवात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मंगळवारपासून छठपूजा उत्सवाला सुरुवात होत आहे. चार दिवस चालणा-या या मंगलमयी उत्सवानिमित्त बजाजनगर परिसरात विविध, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.येथील रामलीला मैदानावर मंगळवारी चतुर्थीनिमित्त नहाये-खाये हा कार्यक्रम पार पडणार आहे. २४ आॅक्टोबरला बुधवारी पंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. २५ आॅक्टोबरला गुरुवारी षष्ठीनिमित्त मावळत्या सूर्याला दुग्ध अर्घ्य दिला जाणार आहे. २६ आॅक्टोबरला शुक्रवारी सप्तमीनिमित्त उगवत्या सूर्यदेवतेची पूजा करून छठपूजा उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. या छठपूजा उत्सवाला उत्तर भारतीय नागरिक व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुजारी राजेश्वरानंद पांडे, विनोद पंडित, सुगंध सिंह, मनोज पंडित, राजन प्रजापती, सारिका सिन्हा, स्नेहा श्रीवास्तव, विक्रम साहा, नीरज पंडित, सोनल सिंह, धीरज पंडित आदींनी केले आहे.वाळूज औद्योगिक वसाहतीत रोजगार व व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय या परिसरात वास्तव्यास आले आहेत. उत्तर भारतात छठपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. वर्षातील महत्त्वाचा हा सण मूळ गावी जाऊन साजरा करणे अनेकांना शक्य नसल्यामुळे या परिसरातील बहुतांश उत्तर भारतीय नागरिक गेल्या काही वर्षांपासून बजाजनगरात हा छठपूजा उत्सव साजरा करीत आहे.भाविकांनी केले श्रमदानउत्तर भारतीय नागरिकांनी छठपूजेनिमित्त श्रमदान करून बजाजनगरातील रामलीला मैदानाची स्वच्छता केली. यावेळी परिसर स्वच्छ करून केर-कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली असून हौदाची स्वच्छता करण्यात आली.