औरंगाबाद : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाची गंगा या कार्यक्रमांतर्गत दि.१३ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासूनच वॉर्ड क्र. ८४, कल्पतरू सोसायटीत विविध विकासकामांचे उद्घाटन होत आहे. सकाळी ९ वा. कासलीवाल राणवारा येथे खुले रंगमंच करणे, ९.३० वा. मयूर टेरेस येथील सोसायटीच्या गार्डनमध्ये खुले रंगमंच करणे, १० वा. जयदुर्गा हाऊसिंग सोसायटीतील खुल्या जागेवर खुले रंगमंच करणे आणि सकाळी ११ वा. मानकनगर येथील संत सावता माळी उद्यानात खुले रंगमंच करणे या विकासकामांचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कल्पतरू सोसायटीतील विविध विकासकामांचे आज उद्घाटन
By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST