हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच आणि बालविकास मंच सदस्यांसाठी २९ जून रोजी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोलीतील माधव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅन्ड क्रिटीकल केअर सेंटर येथे रविवारी दोन सत्रात तज्ज्ञांकडून ही तपासणी केली जाणार आहे. ‘लोकमत’ आणि माधव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅन्ड क्रिटीकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर होत आहे. रविवारी १०.३० ते १.३० आणि दुपारी २.३० ते ५ वाजेपर्यंत माधव हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांकडून महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. यात प्रामुख्याने मुळव्याध, मासिक पाळी, श्वेतपदर या विविध आजारांबरोबरच गर्भवती स्त्रियांना मार्गदर्शन व मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. बालकांमधील हार्निया, हायड्रोक्सील, हायपोस्पाडीयाझ, दुभंगलेले ओठ, अस्थीरोगांच्या तपासणीसोबत रक्तगटाची तपासणी केली जाईल. शिवाय दोन्ही सदस्यांची कान, नाक, घसा आणि दंत तपासणीदेखील केली जाणार आहे. सदस्यांनी ओळखपत्र सोबत आणून मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. माधव मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल अॅन्ड क्रिटीकल केअर सेंटर यांनी या शिबिराचे प्रायोजकत्व स्विकारले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
हिंगोलीत आज मोफत वैद्यकीय तपासणी
By admin | Updated: June 29, 2014 00:23 IST