लातूर : लातूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या धनेगाव (मांजरा प्रकल्प) येथे जॅकवेल येथील ट्रान्सफॉर्मरच्या उभारणीचे काम सुरू आहे़ तसेच गांधी चौक येथील व्हॉल्वची दुरूस्ती, जुन्या रेल्वे स्थानकासमोरील लिकेज दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे़ त्यामुळे गुरूवारी प्रकल्पातून होणारी पंपिंग बंद ठेवावी लागणार आहे़ परिणामी शहरात करण्यात येणारा पाणीपुरवठाही बंद ठेवला जाणार आहे़ नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या व्यत्ययाबाबत मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़
आज शहराचा पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: February 7, 2017 22:26 IST