औरंगाबाद : मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र अशा रमजान महिन्याला सोमवारी सायंकाळपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. सायंकाळी चंद्रदर्शन होईल, असा अंदाज आहे. चंद्रदर्शन होताच रात्री ‘तरावीह’च्या नमाजला सुरुवात होईल. मंगळवारी पहिला रोजा असणार आहे. यंदा कडक उन्हाळ्यात रमजान महिन्याला प्रारंभ होत आहे. दरवर्षी मुस्लिम बांधव रमजानची आतुरतेने वाट पाहत असतात.रविवारी पहाटे ४.१५ वाजता अमावास्या संपली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्रदर्शन होते. सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन होईल. त्यानंतर मरकज-ए-रुयत-ए-हिलाल कमिटीतर्फे रमजान महिना सुरू झाल्याची घोषणा करण्यात येईल. चंद्रदर्शन होताच रात्री विविध मशिदींमध्ये तरावीहच्या नमाजचे आयोजन करण्यात येणार आहे. बहुतांश मशिदींमध्ये पवित्र धर्मग्रंथ ‘कुराण’चे तीन पारे पठण करण्यात येतील. मागील काही दिवसांपासून शहरातील विविध मशिदींमध्ये साफसफाई, पाण्याच्या हौदाची स्वच्छता, पाणी भरणे, रंगरंगोटी आदी कामे करण्यात येत होती. काही मशिदींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तरावीहच्या नमाजचे वेळापत्रकशहरातील ऐतिहासिक जामा मशीद येथे रात्री ९.४५ वाजता इशाची नमाज होईल. ९.०० वाजता तरावीहची नमाज पढण्यात येईल. येथे दररोज एक पारा पढण्यात येणार आहे. नमाजनंतर तफसीर (भाषांतर) होणार आहे. रोजाबाग येथील औलिया मशीद येथे इशाची नमाज ९.४५ वाजता, तरावीह ९.०० वाजता पढण्यात येईल. किलेअर्क येथील शाही मशीद येथे इशा ८.३० वा., तरावीह ८.४५ वा., बायजीपुºयातील गंजे शहिदा मशीदमध्ये इशा ९.०० वा. तर तरावीह ९.१५ वाजता. व्हीआयपी फंक्शन हॉल येथे तरावीहची नमाज ९.३० वाजता सुरू होईल. याठिकाणी दररोज सहा पारे पढण्यात येणार आहेत. जिन्सीतील बशीर लॉन्स येथे तरावीह ८.४५ वाजता होईल. याठिकाणीही सहा पारे पढण्यात येणार आहेत. दिल्लीगेट येथील मक्का मशीदमध्ये इशा ११.४५ वा., तरावीह रात्री १ वाजता पढण्यात येईल.बोहरा समाजात रमजानला प्रारंभ‘बोहरा’ समाजात रविवारपासूनच रमजान महिन्याला सुरुवात झाली. आज पहिला रोजा शहरातील प्रमुख मशिदींमध्ये सोडण्यात आला. सिटीचौक येथील सैफी मशीद, सराफा येथील नजमी मशीद, कलिमी मशीद, वजही मशीदशिवाय सावंगी परिसरातील जमाली पार्क कॉम्प्लेक्स येथे सामूहिक इफ्तार करण्यात आला. बोहरा समाज ‘हिजरी’ कॅलेंडरऐवजी ‘मिस्त्री’ कॅलेंडरनुसार दिनक्रम ठरवितात.-----------
आज चंद्रदर्शन; रमजानला होणार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:28 IST
मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र अशा रमजान महिन्याला सोमवारी सायंकाळपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. सायंकाळी चंद्रदर्शन होईल, असा अंदाज आहे. चंद्रदर्शन होताच रात्री ‘तरावीह’च्या नमाजला सुरुवात होईल. मंगळवारी पहिला रोजा असणार आहे. यंदा कडक उन्हाळ्यात रमजान महिन्याला प्रारंभ होत आहे. दरवर्षी मुस्लिम बांधव रमजानची आतुरतेने वाट पाहत असतात.
आज चंद्रदर्शन; रमजानला होणार प्रारंभ
ठळक मुद्देकडक उन्हाळा : तरावीह, रोजा, इफ्तारची तयारी