शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

तंबाखूमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले

By admin | Updated: May 31, 2014 00:30 IST

हिंगोली : तंबाखूचे सेवन केल्यामुळे ओरल कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी तंबाखू खाणार्‍यांची संख्या कमी होत नसल्याने वैैद्यकीय तज्ज्ञांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

हिंगोली : तंबाखूचे सेवन केल्यामुळे ओरल कॅन्सर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी तंबाखू खाणार्‍यांची संख्या कमी होत नसल्याने वैैद्यकीय तज्ज्ञांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. बदलत्या समाज संस्कृतीमध्ये वावरताना धूम्रपान करणार्‍यांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. वैैद्यकीय तज्ज्ञांच्या मते तंबाखूमुळे मृत्यू ओढवणार्‍यांची संख्या देशात दरवर्षी १० लाखांवर गेली आहे. तंबाखू चघळणार्‍या वैैशिष्ट्यपूर्ण सवयींमुळे देशात दरवर्षी दरवर्षी ३ लाख लोकांना मुख कर्करोग (ओरल कॅन्सर) होतो व त्यातील एक तृतीयांश जणांना मृत्यूला सामोरे जावे लागते. हे धक्कादायक वास्तव्य समोर आले असतानाही देशात ५५ टक्के पुरूष आणि १६ टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. पुरूषांबरोबर महिलांमध्येही तंबाखू चघळण्याचे व धूम्रपान करण्याचे प्रमाण दिसून येत आहे. त्यामध्ये महिलांमधील तंबाखू संबंधित कॅन्सरचे प्रमाण २०१० मध्ये १०.१ टक्के तर २०११ मध्ये १३.१ टक्के झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ३५ वर्ष वयावरील पुरूषांच्या तंबाखू सेवनाचे प्रमाण ६९.३ टक्के तर याच वयोगटातील महिलांचे प्रमाण ५७.७ टक्के असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय किशोरवयीन मुलांमध्येही धूम्रपान करण्याचे प्रमाण दिसून येत आहे. या मागचे मुख्य कारण वातावरण, समाजातील स्वत:विषयीची असुक्षितता वाटणे, किंवा मित्राच्या दबावामुळे प्रवृत्त होणे, ही असल्याची जाणकरांचे मत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) तंबाखू सेवनामुळे मुख कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: १७ ते २२ वर्षे वयोगटातील तरूणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे आता पालकांनीच याबाबतची खबरदारी घेऊन आपल्या पाल्यास तंबाखू सेवनापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान करणार्‍यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कमी वयातील मुले धूम्रपान करीत असल्याने त्यांनाही कर्करोग होवू शकतो. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. - डॉ.नंदकुमार करवा,वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रूग्णालय, हिंगोलीप्रत्येक सिगारेटमध्ये चार हजारपेक्षा जास्त रसायने असतात. त्यापैकी कमीत कमी ४३ रसायने कॅन्सरला कारणीभूत ठरतात. सिगारेटमध्ये निकोटीन नावाचा हानीकारक पदार्थ असतो. सिगारेटच्या व्यसनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, घशाचा कर्करोग आदी आजार होतात. धूम्रपानामुळे दरवर्षी ३५ हजार जणांचा अतिउष्णता वाढून मृत्यू झाल्याचे तर ३ हजार ७०० जणांचा फुफ्फु साचा कर्करोग होवून मृत्यू झाल्याचे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर धूम्रपान सोडता येऊ शकते. प्रारंभी उदास वाटणे, निराश होणे, चिडचिड होणे किंवा झोप न येणे, या समस्या येऊ शकतात; परंतु निराश होता कामा नये. धूम्रपान सोडण्यासाठी निकोटीन पेंच हे रासायनिक द्रव्य शरीरावर लावल्यास व्यसनी व्यक्तीला धूम्रपान करण्याची इच्छा होत नाही, असे यासंदर्भात काम करणार्‍या मदतगटांचे म्हणणे आहे. कोलंबसबरोबर गेलेल्या खलाशांनी अमेरिकेतील रेड इंडियन्सकडून तंबाखूचे कलम युरोपात आले. तेथून ते स्पेनमार्गे जगभर पसरले. प्रारंभी ही औषधी वनस्पती म्हणून वापरली गेली; परंतु १६ व्या शतकापासून तंबाखूंच्या अनिष्ट परिणामांची शंका डॉक्टरांना येऊ लागली, असा तंबाखूचा इतिहास सांगतो.