शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची, मग शिवाजी महाराज वाचा: संभाजीराजे छत्रपती

By संतोष हिरेमठ | Updated: February 14, 2023 20:29 IST

गड किल्ल्यांचे महत्त्व काय, यावर पीएचडी करणार

औरंगाबाद : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळवून दिले. राष्ट्र घडविला असेल, पहिले स्वतंत्र दिले ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजे, 'गड किल्ल्यांचे महत्त्व काय', यावर पीएचडी करणार असे, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत निमित्त १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान ’शिवजन्मोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयाचे उद्घाटन मंगळवारी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र संचालक डॉ.आनंद देशमुख यांची उपस्थिती होती

शिवजन्मोत्सवात होणारे कार्यक्रम...विद्यार्थी विकास मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र यांच्यावतीने कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे.  धनजंय आकात यांचे ’स्पर्धा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास सामोरे जातांना’ या विषयावर गुरुवारी (दि.१६) महात्मा फुुले सभागृहात व्याख्यान होईल. शाहीर अजिंक्य लिंगायत यांचा याच दिवशी सायंकाळी विद्यापीठ नाटयगृहात पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे. तर शिवशाहिर पुरुषोत्तम राऊत यांचा ’रायगडचा छत्रपती’ हा शाहीरीचा कार्यक्रम शनिवारी (दि.१८) सायंकाळी नाटयगृहात होईल. शिवजयंतीदिनी (दि.१९) नांदेडच्या यशवंत महाविद्यालयतील प्रा.विश्वाधर देशमुख यांचे ’शिवरायांसाठी का आठवावे’ या विषयावर व्याख्यान होईल. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थान भुषविणार आहेत. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच दिवशी सकाळी ८ वाजता शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येईल. या संपूर्ण सोहळयास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान व संचालक डॉ.आनंद देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद