बीड : वारी! मराठमोळ्या संस्कृतीचे व चैतन्याचे दर्शन घडविणारा अनोखा सोहळा. आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये विठूरायाच्या चरणी लीन होण्यासाठी बीडमधून हजारो वारकरी मजल, दरजमल करत दिंडीत सहभागी होतात. जिल्ह्यातही हा सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा होतो. विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. बीड तालुक्यातील नारायणगड हे तर ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखले जाणारे पावन क्षेत्र. त्यापाठोपाठ बीड शहरातील कनकालेश्वर, रंगार गल्लीतील विठ्ठल मंदिर, परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रभू वैद्यनाथ मंदिर, बीड तालुक्यातील कपीलधार, चाकरवाडी, वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंप्री आदी ठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल’ या भावनेने लाखो भाविक शुक्रवारी आराधना करणार आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा...४जिल्ह्यातील विविध देवस्थांनानी पंढरपूरच्या वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून जपली आहे. आजही हजारो भाविक पायी दिंडीत सहभागी होतात.४बीड तालुक्यातील नेकनूर येथील बंकटस्वामी, श्री क्षेत्र चाकरवाडी, कपिलधार, कुर्ला येथील महादेव मळी संस्थान, लोळदगाव येथील दत्त संस्थान, लिंबागणेश, चौसाळा, शिरूर कासार येथील सिध्देश्वर संस्थान, आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथगड, धारूर तालुक्यातील अरणवाडी व आसरडोह, पाटोदा, वडवणी, अंबाजोगाई, परळी, केज परिसरातील विविध गावच्या दिंड्याही भक्तीभावाने पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करतात.४आषाढी एकादशीच्या महिनाभर आधीपासूनच वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची आस असते. ऊन, वारा, पाऊस व संसाराची चिंता सोडून वारीची ओढ असते.बीड : जिल्ह्यात समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेली विठ्ठल रखुमाई मंदिरे शुक्रवारी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणार आहेत.परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथ, संत जगमित्र, जाजूवाडी, माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर, केसापुरी येथील केशवराज, गेवराई येथील चिंतेश्वर, आष्टी तालुक्यातील नांदूर (विठ्ठलाचे) येथील मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर मंदिर, धनगरजवळका, बीड तालुक्यातील चाकरवाडी, कनकालेश्वर मंदिर, सोमेश्वर, रंगार गल्लीतील विठ्ठल मंदिरांमध्ये आरती, महापूजा, कीर्तन, भजनाची रेलचेल राहणार आहे. (प्रतिनिधी)
‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,
By admin | Updated: July 15, 2016 01:05 IST