शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांसाठी पुन्हा प्रतीक्षेचीच वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:35 IST

शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अजूनही पूर्णपणे निकाली निघाला नाही. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या होणार असल्याने शिक्षक मंडळी एकीकडे हैराण तर दुसरीकडे ज्यांना बदली अपेक्षित आहे, ते जाम खुश आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अजूनही पूर्णपणे निकाली निघाला नाही. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या होणार असल्याने शिक्षक मंडळी एकीकडे हैराण तर दुसरीकडे ज्यांना बदली अपेक्षित आहे, ते जाम खुश आहेत.शिक्षकांना संवर्ग १ ते ४ मध्ये विभागून त्या-त्या निकषानुसार आॅनलाईन बदल्या करण्याचा शासन निर्णय धडकल्यानंतर त्याला बराच विरोध झाला. मात्र तरीही शासनाने ही प्रकिया रेटून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेला कितीही विरोध झाला, न्यायालयात प्रकरण गेले तरीही ही प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत आणण्यासाठी दिवाळीपर्यंतचा काळही पुरला नाही. दिवाळीच्या सुट्यांतही संवर्ग-३ व ४ च्या बदल्यांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे यात इच्छा नसतानाही अनेकांचे सक्तीने अर्ज भरून घेण्यात आले. सर्व्हरवर अतिरिक्त ताण असल्याने दिवाळीच्या सुट्या शिक्षकांनी याच एका कामात खर्ची घातल्या. त्यानंतरही दोनदा मुदतवाढ द्यावी लागली. यानंतर या बदल्या होण अपरिहार्य दिसत असल्याने विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत मोर्चे काढून आपला विरोध दर्शविला. यात नव्या शिक्षकांपेक्षा जुन्या शिक्षकांचाच विरोध मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच समायोजन झालेल्यांनाही बदलीचा झटका बसू शकतो, हे दिसू लागल्याने तीव्र विरोध होता. मात्र अजून मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या लॉग इनचे काम बाकी असल्याने या बदल्या झाल्या नसल्याचे सांगितले जाते. जर या बदल्या झाल्याच तर आपल्यालाही ‘खो’ बसतो काय? नवीन ठिकाणी कधी रुजू व्हावे लागेल, याची चिंता शिक्षकांना दिसत आहे.