वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे रोजगार हमी योजनेतून बांधबंदिस्ताचे कामे सुरु होऊन एक महिना झाला. परंतु अद्याप मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार हमी योजनेचे काम सहा महिने थांब अशी गत मजुरांवर आली आहे. मजुराकडून एक महिन्यापासून कामे करुन घेतले. परंतु कामाचा मोबदलाच न मिळाल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने आठवड्याचा बाजार कसा करायचा, अशी व्यथा मजुरांनी मांडली. वेळेतवर काम तसेच थकित वेतन तात्काळ अदा करावे, अशी मागणी मजूर वर्गातून होत आहे. मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. (वार्ताहर)
रोहयोच्या मजुरांवर उपासमारीची वेळ
By admin | Updated: May 16, 2016 23:39 IST