शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गौताळा अभयारण्यात पाऊलवाटेवर बिनधास्त फिरला पट्टेरी वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 19:05 IST

Tiger in Goutala Sanctuary गौताळा अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असून, त्याच्या पाऊलखुणा दिसत आहेत.

ठळक मुद्देगौताळ्यात विविध वन्यजीव असून, आता पट्टेरी वाघाचे दर्शनही झाले, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. गौताळा अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याच्या वृत्ताला वन विभागाने दुजोरा दिला.

औरंगाबाद : गौताळा अभयारण्यात सोमवारी (दि. १५) सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान वन कर्मचाऱ्यांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. अवकाळी पावसामुळे ओल्या झालेल्या पाऊलवाटेवर त्याच्या पाऊलखुणाही उमटल्या आहेत.

गौताळ्यात विविध वन्यजीव असून, आता पट्टेरी वाघाचे दर्शनही झाले, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. वन कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी गस्तीवर असताना पाऊलवाटेने जाणारा वाघ कर्मचाऱ्यांना दिसला. यामुळे वनरक्षक तसेच अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत येथे यंत्रणा सतर्क केली. कुणीही जंगलात विनापरवाना प्रवेश करू नये, असा खबरदारीचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात नैसर्गिक वातावरणात बदल झाला असून, वनसृष्टीतही वनजीव बिनधास्त फिरताना आढळून येत आहेत.

वन्यजीव शहरात आले, त्यांनी जनावरांवर हल्ला केला अशा घटना अनेकदा घडल्या आहेत; परंतु नैसर्गिक वातावरण वन्यजिवांसाठी उत्तम वातावरण कोरोना काळात झाले असून, जलसाठेही पाण्याने डबडबलेले आहेत. अन्नसाखळी व्यवस्थित झाल्याने शहर, शेतवस्तीवर किंवा पाळीव जनावरांवरील हल्ले देखील कमी झाले आहेत.

वन विभागाने दिला दुजोरा....गौताळा अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याच्या वृत्ताला वन विभागाने दुजोरा दिला. पाऊलवाटेवरून वाघ जंगलात जाताना गस्तीवरील वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी पाहिले आहे. त्याच्या पाऊलखुणा मिळाल्या आहेत.-विजय सातपुते, विभागीय वनअधिकारी, गौताळा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTigerवाघ