शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी सरपंचांच्या गटांत पाईपलाईनवरून तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:35 IST

पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कारणावरून आजी -माजी सरपंचांच्या गटात तुफान हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्या, तलवारी चालल्याने सरपंचासह पंधरा जण गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड : पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे गुरुवारी दुपारी ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कारणावरून आजी -माजी सरपंचांच्या गटात तुफान हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्या, तलवारी चालल्याने सरपंचासह पंधरा जण गंभीर जखमी झाले.या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पाचोड पोलिसांनी रांजणगाव दांडगा व पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.गुरुवारी दुपारी सरपंच शेख रियाज यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता व ग्रामसेवक आले व नवीन पाईपलाईनची मोजणी सुरु केली.याचवेळी माजी सरपंच अकील पटेल यांनी या पाईपलाईनवर आक्षेप घेतला. यावरुन दोघांत बाचाबाची झाली. गावकºयांनी हे भांडण सोडवले. काही वेळातच दोन्ही गट समोरासमोर आले व तुंबळ हाणामारीस सुरुवात झाली. यात दोन्ही गटातील पंधरा जण जखमी झाले. पोलीस पाटील श्याम शेजूळ यांनी तातडीने पाचोड पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. सपोनि. महेश आंधळे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकसिंगे यांनी लगेच आपला फौजफाटा सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.सर्व जखमींना तात्काळ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भोजने, डॉ. राहुल दवणे, डॉ. काशिनाथ स्वामी, डॉ. सुनीता बांगर, गजानन काफरे, राहुल पवार, नितीन गडकरी व जाधव यांनी जखमींवर उपचार केले. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमींची नावेसरपंच शेख रियाज (३५), शेख राजू (३५), फिरोज शहा (१८), शेख इसाक (४५), फैयाज शब्बीर (३२), इम्रान इसाक शेख , (१८), राजू शाम्मद (३०), अफसर शाम्मद (२६), शेख कदीर (२२).