शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
2
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २० नक्षली ठार
3
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
4
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
5
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
7
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
8
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
9
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
10
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
11
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
12
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
13
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
14
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
15
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
16
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
17
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
18
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
19
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
20
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?

खोडसाळपणाने दोन एटीएम मशीनवर घातले दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 18:38 IST

एखाद्याच्या मनात आले की, कोण काय करेल, हे सांगता येत नाही. अशाच एका घटनेत गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील समर्थनगर येथील दोन वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मशीनवर एका जणाने दगड घातले. यात दोन्ही मशीनच्या स्क्रीन फुटल्याने त्यांचे कामकाज ठप्प झाले.

औरंगाबाद, दि.22 : एखाद्याच्या मनात आले की, कोण काय करेल, हे सांगता येत नाही. अशाच एका घटनेत गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील समर्थनगर येथील दोन वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मशीनवर एका जणाने दगड घातले. यात दोन्ही मशीनच्या स्क्रीन फुटल्याने त्यांचे कामकाज ठप्प झाले.

याविषयी अधिक माहिती देताना क्र ांतीचौक ठाण्याचे निरीक्षक अनिल आढे म्हणाले की, समर्थनगर येथील मुख्य रस्त्यावर विविध बँकांचे एटीएम सेंटर आहेत. गुरुवारी रात्री साडेबारा ते १ वाजेच्या सुमारास भारतीय स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेचे एटीएमवर एका जणाने हल्लाबोल केला. समर्थनगर परिसरात राहणाºया गोमटे नावाच्या सुमारे ५५ वर्षीय व्यक्तीने रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एटीएम सेंटरवर चक्कर मारली. यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास पुन्हा तेथे गेला आणि एटीएम मशीनवर त्याने भलामोठा दगड घातला. या घटनेत एटीएमची स्क्रीन खराब झाली आणि घटनेपासून एटीएमचे कामकाज ठप्प झाले. विशेष म्हणजे तो रस्त्यावरून दगड घेऊन एटीएम सेंटरमध्ये गेल्याचे तेथील सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे.

तत्पूर्वी १२.३० वाजेच्या सुमारास याच गोमटे नावाच्या व्यक्तीने भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएम सेंटरवर धाव घेतली. प्रथम त्याने सीडीएमवर (पैसे जमा करण्याचे मशीन) वीट मारली. मात्र, या मशीनची स्क्रीन मजबूत असल्याने स्क्रीनला काहीच झाले नाही. यामुळे त्याने दुसरी वीट शेजारी असलेल्या एटीएम मशीनवर घातली. यात मात्र मशीनचे नुकसान झाले. त्याचे हे कृत्यही सीसीटीव्हीत कैद झाले. बँक व्यवस्थापक संतोष वर्तक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

तरुण, सुरक्षारक्षकाने कळविले पोलिसांनाक्रांतीचौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव आणि कर्मचारी हे रात्रपाळीच्या गस्तीवर होते. घटनेच्या दहा मिनिटे आधीच तेथून ते बसस्थानकाकडे गेले. मशीनवर गोमटे यांनी दगड घातल्याने आवाज झाला. त्या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नाही. मात्र, एटीएम सेंटरसमोरील फेडरल बँकेने सुरक्षारक्षक नेमलेला आहे. या सुरक्षारक्षकाने गोमटेला दगड हातात घेऊन जाताने पाहिले होते. शिवाय गोमटे एटीएम फोडून निघून गेल्यानंतर तेथे दोन मुले पैसे काढण्यासाठी आले तेव्हा त्यांना एटीएमच्या काचा फु टलेल्या आणि  विटाचे तुकडे पडलेले दिसले. त्यांनी ही बाब तात्काळ पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.