शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत घर मालकाच्या तीन वर्षाच्या मुलाचा खून करणार्‍यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:29 IST

घरमालकाच्या तीनवर्षीय मुलाचे अपहरण करून, त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा गळा आवळून खून करणारा आरोपी भाडेकरू रितेश नाडे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (दि.१२) खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

औरंगाबाद : घरमालकाच्या तीनवर्षीय मुलाचे अपहरण करून, त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा गळा आवळून खून करणारा आरोपी भाडेकरू रितेश नाडे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (दि.१२) खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याबद्दल १० वर्षे सश्रम कारावासही सुनावला. आरोपीला या दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगावयाच्या आहेत.

राजनगर येथील सुदाम कांबळे यांच्या घरातील भाडेकरूरितेश अभय नाडे (२८) याने १३ जुलै २०१४ रोजी दुपारी सागर कांबळेचे (३ वर्षे) अपहरण केले.  सागर हरवल्याची तक्रार आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिली.  सहायक पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने संशयावरून भाडेकरू  रितेशला  ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करत घर झडती घेतली तेव्हा  कपड्याच्या गाठोड्यात सागर बेशुद्धावस्थेत आढळला. शवविच्छेदन अहवालामध्ये सागरवर अनैसर्गिक कृत्य करून त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे रितेश नाडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी मधुकर साळवे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याच्या सुनावणीत सहायक लोकअभियोक्ता उदय पांडे यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायवैद्यक अहवाल, तपास अधिकारी आणि मृत सागरच्या आईची साक्ष याप्रकरणात महत्त्वाची ठरली.