लातूर : अनधिकृत बांधकाम धारकांवर महानगरपालिकेने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतली आहे़ अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत़ अवंती नगर येथे दोन व बसस्थानक परिसरात एक अशा तिघा विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत़ शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात २४ नोव्हेंबर २०१४ रोजी २ वाजण्याच्या सुमारास रविंद्र गोप्ीाकिसन अग्रवाल या व्यावसायिकाने बांधकाम परवाना क्रमांक एनएलएल/टीपी /८/ २३०/२०१३/१४ अन्वये बांधकाम न करता त्यापेक्षा जास्तीचे अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले़ या प्रकरणी महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी किसनराव माने यांनी घटनास्थळी भेट दिली असता, अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले आहे़ या प्रकरणी मनपाचे क्षेत्रीय अधिकारी किसनराव माने (वय ३८) यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रविंद्र गोपीकिसन अग्रवाल (रा़लातूर) यांच्या विरुद्ध कलम ५४/७ नुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ या प्रकरणाचा अधिक तपास गांधी चौक पोलिस करीत आहेत़ दरम्यान, शहरातील आवंती नगर परिसरात नितीन मंडाले यांनी बांधकाम परवाना बांधकाम परवानगीनुसार मंजूर नकाशापेक्षा जास्तीचे बांधकाम केले या प्रकरणी मंगळवारी मनपाच्या क्षेत्रीय अधिकारी सिंधू मारोजी शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन मंडाले रा़अवंती नगर यांच्याविरूध्द कलम ५२ सह ४३ मनपा रचना अधिनियम १९६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला़या प्रकरणाचा तपास बळवंते करीत आहेत़(प्रतिनिधी)आवंती नगर येथे खाँजाबी सत्तारखाँन पठाण व अन्य एकाने अनाधिकृत बांधकाम केले़ मनपाकडे परवानगी घेतली नाही़ त्यामुळे मनपाचे क्षेत्रीय अधिकारी सिंधू शिंदे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन खाँजाबी पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ मनपाने आतापर्यंत तीन गुन्हे दाखल केले आहेत़
तिघा अनधिकृत बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल
By admin | Updated: March 5, 2015 00:03 IST