शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

बीडमध्ये तीन हजार नळ कनेक्शन अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:29 IST

बीड : शहरात फुकटात जागा, साहित्य व पाणी वापरणा-यांची संख्या आधिक आहे. असाच प्रकार बुधवारी पाणीपुरवठा विभागातील समोर आला ...

ठळक मुद्देदोन वर्षांपासून न.प.कडून सर्वेक्षणच नाही

बीड : शहरात फुकटात जागा, साहित्य व पाणी वापरणा-यांची संख्या आधिक आहे. असाचप्रकार बुधवारी पाणीपुरवठा विभागातील समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार शहरात तीन हजार नळ कनेक्शन अवैध आहेत. त्यानंतर पालिकेने सर्वेक्षणच केले नाही. त्यामुळे बीड पालिकेचे पाणी अनेकजण फुकटात वापरत असल्याचेही दिसून येते.

बीड नगर पालिकेतील राजकारण गाजत असतानाच पालिकेतील गलथान कारभारही चव्हाट्यावर येत आहे. आगोदरच बीड शहराला आठ ते दहा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. त्यात हद्दवाढ भागात तर वेळच्यावेळी पाणीच येत नाही. अशातच बीड शहरात एका घरात दोन ते तीन अवैध नळ कनेक्शन घेतले जात आहेत. हे सर्व धनदांडगे आणि राजकीय लोक आहेत. तसेच काही लोक अधिकारी, कर्मचा-यांच्या जवळचे असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. परंतु हा सर्व प्रकार पालिकेसाठी घातक ठरत आहेत.

कारवाईस वसुली विभागाचा आखडता हातएवढा गंभीर प्रकार असतानाही पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच ज्या लोकांनी पाणीपट्टी भरली नाही, ज्यांच्याकडे अवैध नळ कनेक्शन आहेत, अशांवर कारवाई करण्यास वसुली विभाग आखडता हात घेत आहे.हा सर्व प्रकार संशयास्पद असून वसुली व पाणीपुरवठा विभाग संशयाच्या भोवºयात सापडला आहे. त्यामुळे आता कनेक्शनधारकांची तर चौकशी करावीच परंतु अधिकारी, कर्मचा-यांचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केली आहे.

पेठबीडमध्ये सर्वाधिक अवैध कनेक्शनबीड शहरात पेठबीड भागात सर्वाधिक नळ कनेक्शन असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. या लोकांना प्रत्येक वर्षी केवळ नोटिसांचा पाहुणचार केला जातो. प्रत्यक्षात मात्र काहीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.