शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेपमधील तीन संशयितांना २४ तासात गुन्हेशाखेने ठोकल्या  बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 18:51 IST

घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हेशाखेने २४ तासात बेड्या ठोकल्या. सागर सुभाष बुट्टे(वय २०), उमेश उत्तम डुकळे(वय२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड(वय२६,सर्व रा.जयभवानीनगर)असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

औरंगाबाद, दि. ९ : घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हेशाखेने २४ तासात बेड्या ठोकल्या. सागर सुभाष बुट्टे(वय २०), उमेश उत्तम डुकळे(वय२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड(वय२६,सर्व रा.जयभवानीनगर)असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या आरोपींनी पीडितेला अमानुष मारहाण केल्याने ती गंभीर जखमी असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. 

या खळबळजनक घटनेविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की,गारखेडा परिसरातील भारतनगर येथील रहिवासी २२ वर्षीय विवाहिता ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वराजनगर येथे राहणा-या चुलतीला भेटून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे घरी जात होती.यावेळी जयभवानीनगर चौकात आरोपी सागर रिक्षाचालक तिला भेटला. तेव्हा त्याच्या रिक्षात आरोपी उमेश आणि अनिल हे बसलेले होते. त्याने रेल्वेस्टेशनला सोडतो,चल असे म्हणून रिक्षात बसविले.

यानंतर त्यांनी पीडितेला रेल्वेस्टेशनला न सोडता ते तिला घेऊन विमानतळ भिंतीलगतच्या रेल्वेगेटकडील एका पडक्या वाड्यात घेऊन गेले. तुम्ही मला इकडे कोठे घेऊन आला,असे विचारताच आरोपींनी तिला चाकूने भोसकून मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी प्रथम सागरने आणि नंतर उमेश व अनिल यांनी तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिने आरडाओरड करू नये, म्हणून नराधमांनी तिच्या तोंडाला पट्टी बांधली. अमानुष अत्याचार  केल्यानंतरही त्यांनी तिला सोडून दिले नाही. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस डांबून ठेवले. यानंतर घटनेची कोठेही वाच्यता केल्यास, तुला मारून टाकीन अशी धमकी देत त्यांनी तिच्या पायाच्या नळगीवर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. शनिवारी रात्री आरोपीं आरोपी तिकडे न फिरकल्याने पीडितेने स्वत:ची सुटका करून घेतली.यानंतर ती घरी गेली.घडलेली सर्व घटना तिने पतीला सांगितली. रविवारी दुपारी पीडिता पतीसह मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली. तेथे तिने नराधमांविरूद्ध फिर्याद नोंदविली. 

अशी झाली अटकघटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकाँ संतोष सोनवणे, विजयानंद गवळी,सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, नंदलाल गवळी,धर्मराज  गायकवाड,लालखॉ पठाण, योगेश गुप्ता, हिरा राजपूत यांनी मोठ्या शिताफीने सागरसह अन्य दोन जणांना बीड बायपास परिसरातून पकडले.