शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची तीन पिले आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:23 IST

कन्नड तालुक्यातील आलापूर शिवारात बिबट्याची तीन नवजात पिले आढळल्याने ग्रामस्थ व शेतकºयांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शिवना -टाकळी मध्यम प्रकल्पाच्या जवळच पुनर्वसित आलापूर शिवारात गुलाबराव विश्वनाथ कोरडे यांच्या गट क्र.४२ मधील शेतात उसतोड सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात बिबट्याची तीन पिले आढळली.

लोकमत न्यूज नेटवर्कहतनूर : कन्नड तालुक्यातील आलापूर शिवारात बिबट्याची तीन नवजात पिले आढळल्याने ग्रामस्थ व शेतकºयांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.शिवना -टाकळी मध्यम प्रकल्पाच्या जवळच पुनर्वसित आलापूर शिवारात गुलाबराव विश्वनाथ कोरडे यांच्या गट क्र.४२ मधील शेतात उसतोड सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात बिबट्याची तीन पिले आढळली.त्यांना बघताच त्यांच्या पाचावर धारण बसली. या कामगारांनी आरडाओरड केल्यानंतर जवळपास ५० शेतकरी जमा झाले. अर्धा तास त्या पिलांना शेतकरी व कामगारांनी पकडून ठेवले. परंतु पिले पाहून बिबट्या हल्ला करेल, या भितीने त्यांनी ही पिले ऊसाच्या फडात सोडून दिले.वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे, वनपाल एल.व्ही.घुगे, आर. व्ही. शिंदे, वनरक्षक एम. आर. गुरसाळे, एन.के. घोडके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या वन कर्मचारी परिसरातच ठाण मांडून असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे यांनी सांगितले.वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा व त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोपट राजपूत, संजय भेंडाळे, साहेबराव शिरसाठ, बाबासाहेब पवार आदींसह ग्रामस्थानी केली आहे.दोन वर्षांपासून जैतापूर, आलापूर, हतनूर, केसापूर, टापरगाव शिवारात बिबट्याचे दर्शन होत आहे. या संपूर्ण परिसरात उसाचे घनदाट क्षेत्र असल्याने बिबट्याने अजून तरी स्थलांतर न केल्याने शेतकºयात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटे हे नर मादी तर आहेतच. मात्र तिन्ही पिले आढळल्याने शाळकरी मुलांसह शेतकरी, महिला, मजूरही घाबरलेले आहेत.