शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

तीन लाख भाविक दाखल

By admin | Updated: August 11, 2014 01:54 IST

श्रीक्षेत्र माहूर : नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त गडावरील पवित्र ठिकाणांचे दर्शन घेण्याकरिता परिक्रमा यात्रेसाठी राज्यभरातून तीन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत़

श्रीक्षेत्र माहूर : नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त गडावरील पवित्र ठिकाणांचे दर्शन घेण्याकरिता परिक्रमा यात्रेसाठी राज्यभरातून तीन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत़ गर्दीचे व्यवस्थापन करताना संस्थानासह एसटी महामंडळ व पोलिसांची दमछाक होत आहे़दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुळ शक्तीपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थान, श्री दत्त शिखर संस्थान, श्री अनुसया माता संस्थान, श्री देवदेवेश्वर संस्थान, शेख फरीदाबाद दर्गाह या देवस्थानांवर भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे़ परंतु भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ होवून शहरात पहिल्याच दिवशी ३ लाखांवर भाविक आल्याने पोलिस व एसटी महामंडळास व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागली़ दर्शनासाठी आलेले ९० टक्के भाविक ४५ कि़मी़ची परिक्रम यात्रा पायी करीत असल्याने पोलिसांना जंगलासह अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावावा लागला़ तर अनेक स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांना ठिकठिकाणी चहा, फराळ, पाणी पाऊच वाटून सेवा करण्याचा आनंद घेत होते़ भाविक देवतांच्या नावाच्या जयघोषात पायी मार्गक्रमण करीत होते़पोलिस निरीक्षक डॉ़अरूण जगताप, सपोनि अनिल जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक यांच्यासह पोलिसांनी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकावरून भाविकांना सूचना देणे, एसटीमध्ये चढताना-उतरताना भाविकांची काळजी घेणे, गडावरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होवू न देणे व इतर समस्या तत्काळ सोडविण्याची खबरदारी घेत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही़ एसटी महामंडळाने भाविकांची वाहतूक करण्यासाठी १०० बसेसची व्यवस्था करूनही बसेस कमी पडल्याने आगारप्रमुख पडवळ, यात्राप्रमुख बेग यांनी स्वत: घाटात वाहतुकीची कोंडी होवू नये, यात्रिकांना त्रास होवू नये याची खबरदारी घेत असल्याचे दिसून आले़ (वार्ताहर)यात्रेत आलेले भाविक ४५ कि़मी़चे अंतर २४ तासापर्यंत चालून पूर्ण करत असून भाविकांच्या सोयीसाठी पोलिस, एसटी महामंडळ पूर्ण दक्षतेने सेवा देत आहेत़ श्री रेणुकादेवी संस्थानवर भाविकांसाठी स्वयंसेवी संस्थासह दानशूर व्यक्तींकडून महाप्रसाद, अन्नदान करण्यात येत असल्याची माहिती पी़डी़चव्हाण यांनी दिली असून यासह सर्वच देवस्थानांवर अन्नदान महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे़