औरंगाबाद : दहावर्षीय बालिकेची विक्री करण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या त्रिकुटांना पकडण्यात जवाहरनगर पोलिसांना शनिवारी यश आले. आरोपींमध्ये एका दाम्पत्यासह वृद्ध महिलेचा समावेश आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली.शिवाजी पाटील (रा. चैतन्यनगर, पडेगाव), त्याची पत्नी प्रिया ऊर्फ वैशाली ऊर्फ उषा शिवाजी पाटील आणि शिवाजीची सासू विमल सरगयी (रा. कर्णपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, आरोपी शिवाजीचे मुंबईतील कळवा येथेही घर आहे. त्याची प्रिया ही दुसरी बायको आहे. गारखेड्यातील इंदिरानगर येथे राहणाऱ्या दहावर्षीय बालिकेचे ६ सप्टेंबर रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी तिच्या आईने जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बालिका ११ सप्टेंबर रोजी घाटी परिसरात सापडली होती. तेव्हापासून पोलीस तिच्या अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. अनेक अडथळे पार करीत पोलीस मुख्य (पान ७ वर)अपहरणकर्त्यांनी तिला ज्या रस्त्याने नेले त्या रस्त्यावरील घरात आरोपींची माहिती मिळते का, याबाबत पोलीस तपास करीत होते. काही दिवसांपूर्वी पीडितेला घेऊन पोलीस रेल्वेस्टेशनकडून बाबा पेट्रोलपंपाकडे जात असताना पदमपुरा येथील हनुमान मंदिर पीडितेला दिसले. ४त्यावेळी तिने याच ठिकाणी एका म्हातारीने एका माणसाच्या ताब्यात आपल्याला दिल्याचे सांगितले. तसेच त्या माणसाच्या बायकोच्या नाकाला व्यंग (नकटे) असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पदमपुरा परिसरात त्या म्हातारीचा आणि नकटे नाक असलेल्या महिलेविषयी माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा ती कर्णपुरा येथे राहत असल्याचे समजले. ४तेव्हा या अपहरणाचा उलगडा झाला. पीडिता ही ६ रोजी दुपारी घाटी परिसरात राहणाऱ्या आजीला भेटण्यासाठी घरातून एकटीच पायी निघाली. चालत थकल्यामुळे ती पदमपुरा येथील हनुमान मंदिराजवळ बसली. बालिका सापडल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार केले. प्रचंड घाबरलेल्या बालिकेला चटके देण्यात आल्याचे आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, उपनिरीक्षक मीरा लाड आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. पीडितेने सांगितल्याप्रमाणे आरोपींच्या वर्णनाचे स्केचही काढण्यात आले.
बालिकेचे तीन अपहरणकर्ते अटकेत
By admin | Updated: November 6, 2016 01:07 IST