शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

एका तासात आगीच्या तीन घटना

By admin | Updated: October 31, 2016 00:53 IST

नांदेड : दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा आनंद साजरा होत असताना शहरात रात्री साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास आगीच्या तीन घटना घडल्या़

नांदेड : दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा आनंद साजरा होत असताना शहरात रात्री साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास आगीच्या तीन घटना घडल्या़ जुना मोंढा येथील कापड दुकानाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले तर अन्य दोन ठिकाणच्या आगीत अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेवून आग आटोक्यात आणली़शहरात दिवाळीसाठी बाजारपेठ फुलली असताना रविवारी संध्याकाळी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती़ लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधल्यानंतर फटाक्यांची आतषबाजीही सुरू होती़ आनंदोत्सव साजरा सुरू असताना रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी जुना मोंढा भागात फैजल अफगाण क्लॉथ सेंटरला अचानक आग लागली़ पाहता पाहता आगीचे लोळ उठू लागले़ ही माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी रईस पाशा व अन्य कर्मचारी एका बंबासह पोहोचले़ पहिल्या मजल्यावर असलेल्या या पत्र्याच्या दुकानात पाण्याचा मारा वरील बाजूने केल्याने आग आटोक्यात आली़ ही आग आटोक्यात आणण्यासाठी २ बंब लागल्याचे अग्निशमन अधिकारी रईस पाशा यांनी सांगितले़ या आगीत मोठे नुकसान झाले आहे़ सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही़ त्याचवेळी ही आग फटाक्यांमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे़जुना मोंढा येथील आग विझताच महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या एका विद्युत डीपीत शॉर्टसर्कीट झाले़ त्यामुळे डीपीजवळ असलेल्या कचऱ्यास आग लागली़ त्यामुळे वजिराबाद भागात भितीचे वातावरण निर्माण झाले़ अग्निशमन विभागाने तत्काळ पोहोचून आग विझवली़ तर पूर्णा रोडवर महंमद मुश्ताक यांच्या मोटारसायकल गॅरेजला रात्री सव्वा नऊच्या सुमारास आग लागली़ इथेही अग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने नुकसान टळले़ शहरात एका तासात आगीच्या तीन घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र चांगलीच पळापळ झाली़