शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
2
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
7
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
8
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
9
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
10
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
11
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
12
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
13
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
14
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
15
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
16
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
17
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
18
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
19
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
20
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभागाचे तीन हॉटेलवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:45 IST

आयकर न भरणा-या बीड बायपास रोडवरील तीन हॉटेलवर आयकर विभागाच्या पथकांनी शुक्रवारी छापे टाकून कागदपत्रांची कसून चौकशी सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आयकर न भरणा-या बीड बायपास रोडवरील तीन हॉटेलवर आयकर विभागाच्या पथकांनी शुक्रवारी छापे टाकून कागदपत्रांची कसून चौकशी सुरू केली. हॉटेलवर कारवाई करण्याची वर्षभरातील ही पहिलीच वेळ आहे.आयकर न भरणाºया करदात्यांना शोधणे, नवीन आयकरदाते निर्माण करण्यासाठी आयकर विभागाने कंबर कसली आहे. कर न भरणाºया व्यावसायिकांना शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे व त्यांना आयकराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विभागाने पाऊल टाकणे सुरू केले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर विभागाची मोहीम थंडावली होती; पण आता पुन्हा कर न भरणा-यांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या अंतर्गत शुक्रवारी बीड बायपास, झाल्टा रोडवरील त्रिमूर्ती, सोनिया व गुरूसाई या तीन हॉटेलवर छापे टाकण्यात आले.दुपारी आयकर अधिका-यांच्या तीन पथकांनी एकाच वेळेस तीन हॉटेलवर कारवाईला सुरुवात केली. प्रत्येक पथकात ५ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. दुपारपासून या तीन हॉटेलसमोर आयकर अधिका-यांच्या गाड्या उभ्या होत्या. रात्री उशिरापर्यंत हॉटेलमधील खरेदी बिल, विक्री बिल आदी लेखाजोखाची कसून तपासणी केली जात होती. अशा कारवाईत हॉटेलमध्ये दररोज किती ग्राहक येतात. खर्च वजा होता नफा किती मिळतो याची आकडेवारी काढण्यात येते. तसेच आयकर भरला नसेल तर हॉटेल कधीपासून चालू आहे तेव्हापासूनची उलाढाल काढण्यात येईल व त्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येते. कारवाई आयकर विभागाचे सहआयुक्त विश्वास मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कारवाई सुरू असल्याने माहिती देण्यास नकार दिला. राष्ट्रहितासाठी करदात्यांनी आयकर भरावा, असे आवाहन त्यांनी केले.