शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक कॉपी करणाऱ्या ३२२ विद्यार्थ्यांवर तीन परीक्षा बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:58 IST

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोंदेगाव (ता.सोयगाव ) येथील शाळेत दहावीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला सामूहिक कॉपी केल्याच्या प्रकरणात ३२२ परीक्षार्थ्यांना आगामी तीन परीक्षांसाठी (वन प्लस टू) बंदी घालण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला. सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी शिक्षकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स.भु. संस्थेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देविभागीय शिक्षण मंडळाची कारवाई : स.भु.संस्थेच्या गोंदेगाव येथील शाळेतील गैरप्रकार

औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोंदेगाव (ता.सोयगाव ) येथील शाळेत दहावीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला सामूहिक कॉपी केल्याच्या प्रकरणात ३२२ परीक्षार्थ्यांना आगामी तीन परीक्षांसाठी (वन प्लस टू) बंदी घालण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला. सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी शिक्षकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स.भु. संस्थेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ११ मार्च रोजी गणित भाग-१ विषयाची परीक्षा होती. या परीक्षेत गोंदेगावच्या सरस्वती भुवन हायस्कूल केंद्राला भरारी पथकाने भेट दिली. यावेळी शिक्षक, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकच विद्यार्थ्यांना कॉर्बन कॉपीच्या साह्याने कॉपी पुरवीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. भरारी पथकातील माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, जे. व्ही. चौरे, एम. आर. सोनवणे यांच्या पथकाने केंद्रातील सर्व हस्तलिखित कार्बन कॉपी हस्तगत केली. तसेच इतरही पुरावे गोळा करून गोपनीय अहवाल विभागीय मंडळाला त्याच दिवशी कळविला. मंडळाने तात्काळ केंद्र संचालकांची हकालपट्टी केली होती. कॉपी झालेल्या गणिताच्या उत्तरपत्रिकाही मंडळात मागविल्या. यानंतर चौकशी करण्यासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांची समिती स्थापन केली होती. या समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन शिक्षकांची हस्ताक्षरे तपासली. या समितीच्या अहवालात शिक्षकांसह विद्यार्थ्यांना दोषी ठरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनाही बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. भरारी पथक, प्राथमिक शिक्षणाधिकाºयाचा अहवाल, विद्यार्थ्यांची बाजू आणि तपासलेल्या उत्तरपत्रिकांवर असलेली मास कॉपी पाहून २३ जून रोजी विभागीय मंडळाच्या तदर्थ समिती बैठकीत विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांवर चालू वर्षाचा निकाल रद्द करून वन प्लस टू ची कारवाई करण्यात आली. मुख्य आरोपी शिक्षकांवर निलंबनाची आणि इतरांच्या वेतनवाढी रोखण्याच्या सूचना स.भु.संस्थेला दिल्याचे अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा अहवाल व कारवाईची माहिती शाळा आणि संस्थेला शनिवारी कळविण्यात येणार असल्याचे समजते.कोटसरस्वती भुवन हायस्कूल, गोंदेगाव येथील दहावीच्या परीक्षेत झालेल्या मास कॉपी प्रकरणात मंडळाने नियमानुसार कारवाई केली आहे. नियमबाह्य कोणतेही पाऊल मंडळाने उचलले नाही. कॉपीसारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व बाजू तपासून निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना शनिवारी पत्र देण्यात येईल.-शरद गोसावी, अध्यक्ष, विभागीय मंडळ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा