शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

दोन अपघातात तिघांचा मृत्यू

By admin | Updated: December 28, 2015 00:17 IST

तुळजापूर : अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका ५० वर्षीय महिला भाविकाचा मृत्यू झाला़ तर अज्ञात वाहनानेच दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले असून

तुळजापूर : अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका ५० वर्षीय महिला भाविकाचा मृत्यू झाला़ तर अज्ञात वाहनानेच दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे़ जखमीला सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ यातील एक अपघात बोरी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास तर दुसरा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर शहरानजीक घडला़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील विवेक गोविंद भोसले (वय-२५), प्रशांत दत्तात्रय हुंडेकरी (वय-२२) व प्रशांत गोरख जाधव हे तिघे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास श्री गार्डन धाब्यापासून तुळजापूर शहराकडे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५-एक्स़८१०४) येत होते़ त्यांची दुचाकी शहरानजीक आली असता अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली़ ही धडक इतकी भीषण होती की, विवेक भोसले व प्रशांत हुंडेकरी या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला़ तर जखमी प्रशांत जाधव याला उपचारासाठी तुळजापूर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ याबाबत प्रशांत सुनिल मेसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास पोउपनि जमदाडे हे करीत आहेत़कळंब तालुक्यातील भाटसांगवी येथील शोभा खंडू अलाट (वय-५०) या रविवारी पहाटेच्या सुमारास पायी चालत तुळजापूरकडे येत होत्या़ शोभा अलाट या बोरी (ता़तुळजापूर) शिवारात आल्या असता अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली़ या अपघातात शोभा अलाट यांचा जागीच मृत्यू झाला़ याबाबत सुनिल खंडू अलाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकांविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनेचा अधिक तपास पोउपनि अनिल किरवाडे हे करीत आहेत़ (वार्ताहर)