शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

औरंगाबाद येथे अखेर बेकायदेशीर गर्भपात करणा-या बोगस डॉक्टर महिलेसह तीन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:05 IST

भालगाव येथे अवैध गर्भपात केंद्र चालविणा-या महिलेला रविवारी दुपारी मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे तर संमतीविना विवाहितेचा गर्भपात करणा-या तिच्या पती आणि नंदईला बजाजनगर येथे पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भालगाव येथे अवैध गर्भपात केंद्र चालविणा-या महिलेला रविवारी दुपारी मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे तर संमतीविना विवाहितेचा गर्भपात करणा-या तिच्या पती आणि नंदईला बजाजनगर येथे पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले.बोगस डॉक्टर ललिता मून ऊर्फ खाडे (रा. आपत भालगाव), तक्रारदार महिलेचा पती सुनील वाघ आणि नंदई बापू डिघोळे (रा. बजाजनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड यांनी सांगितले की, पुंडलिकनगर येथील विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या संमतीविना गर्भपात केला होता. गतवर्षी झालेल्या या घटनेप्रकरणी विवाहितेने पुंडलिकनगर ठाण्यात मागील आठवड्यात गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याच्या तपासात तिचा गर्भपात करण्यात आलेल्या आपत भालगाव येथील ललिता मून ऊर्फ खाडे या बोगस डॉक्टर महिलेच्या घरावर वैद्यकीय अधिकाºयांना सोबत घेऊन पोलिसांनी छापा मारला असता तेव्हा तेथे तिने घरातच अवैध गर्भपात केंद्र सुरू केल्याचे समोर आले. तेथे मोठ्या प्रमाणावर गर्भपाताच्या औषधींचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे देण्यात आला आहे. छाप्यानंतर पोलिसांनी ललिता मून ऊर्फ खाडे हिला नोटीस देऊन दुसºया दिवशी ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. मात्र अटकेच्या भीतीपोटी ती पसार झाली होती. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड, कर्मचारी गणेश डोईफोडे, कल्पना जांभोटकर, बाळाराम चौरे, जालिंदर मांटे, विशेष पोलीस अधिकारी संतोष बोधक आणि गुट्टे यांच्या पथकाने आरोपी खाडे हिला मुकुंदवाडीतील संघर्षनगर येथून तर तक्रारदार महिलेचा पती सुनील वाघ आणि नंदई बापू डिघोळे यांना बजाजनगर भागातून अटक केली. अवैध गर्भपात केंद्र चालविण्याचे स्वतंत्र कलम गुन्ह्यात वाढवून त्याबाबतच्या अहवालासह सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सपोनि आव्हाड यांनी सांगितले.