शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

सुमारे दीड लाख नागरिकांना त्रास

By admin | Updated: May 27, 2014 01:21 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १६ वॉर्डांचा समावेश होतो. दीड लाखांहून अधिक नागरिक या वॉर्डांमध्ये राहतात.

औरंगाबाद : महापालिकेच्या वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत १६ वॉर्डांचा समावेश होतो. दीड लाखांहून अधिक नागरिक या वॉर्डांमध्ये राहतात. मागील चार महिन्यांपासून विविध वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाला सहा महिन्यांपासून उपअभियंताच नाही. त्यामुळे दुरुस्तीची शेकडो कामे ठप्प पडली आहेत. दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी विविध वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे करण्यात येतात. यंदा उन्हाळ्यात वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत येणार्‍या वॉर्डांमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पावसाळ्याच्या तोंडावर गंभीर समस्या निर्माण होणार आहे. १६ वॉर्डांमध्ये ठिकठिकाणी मिळून शंभरहून अधिक लिकेज आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास पावसाचे साचलेले पाणी जलवाहिन्यांमध्ये जाईल. त्यामुळे दूषित पाणी नागरिकांना पिण्याची वेळ येणार हे निश्चित. मनपाच्या या भोंगळ कारभारामुळे दीड लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. वॉर्ड ‘अ’ कार्यालयाला उपअभियंता द्यावा, अशी मागणी वॉर्डातील दहापेक्षा अधिक नगरसेवकांनी प्रशासनाला केली. मात्र, प्रशासनाने आतापर्यंत लक्ष दिलेले नाही. कनिष्ठ अभियंता आणि कार्यकारी अभियंताच मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे कामकाज पाहत आहेत. अलीकडेच कार्यकारी अभियंताही आजारी पडले. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग पोरका झाला आहे. कनिष्ठ अभियंत्याकडे उपअभियंत्याचा अतिरिक्त पदभार देण्यास प्रशासन तयार नाही. दुसर्‍या वॉर्डातील उपअभियंत्याला अतिरिक्त कार्यभार देण्यासही टाळाटाळ होत आहे. (लोकमत ब्युरो) आंदोलनाचा इशारा वॉर्डाला उपअभियंताच नसल्याने पाणीपुरवठ्याची अनेक कामे खोळंबली आहेत. पावसाळ्यापूर्वी मनपा प्रशासनाने नवीन अधिकार्‍याची नेमणूक न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. वॉर्ड ‘अ’ कार्यालयाला अधिकारी द्यावा, या मागणीकडे मनपा प्रशासन गांभीर्याने बघायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.