लातूर : विमान म्हणजे लहान थोरांच्या आवडीचा आणि कुतुहलाचा विषय़ घरावरून विमान निघाल्याच्या आवाज ऐकू आला की सर्वांची नजर आकाशाकडे भिरभिरते़ काही हजार किलोमीटर अंतरावरील विमानाचा आनंद होतो़ हेच कुतुहूल कमी करण्यासाठी लोकमत बालविकास मंच व पीबीसी एरोहब महाराष्ट्र प्रव्हिएशन सेक्टर यांच्या वतीने अवेरनेस कार्यक्रम राबविण्यात आला आहे़ या कार्यक्रमांतर्गत शहरातील काही निवडक शाळांमध्ये व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे आयोजन केले गेले़ विद्यार्थ्यांमध्ये विमान अभियांत्रिकी व अवकाश यान यंत्राबाबत जागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे़ सोमवार व मंगळवार या दोन दिवशी शहरातील १० शाळांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला़ लोकमत बालविकास मंचतर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये विमानाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली़विमान कसे तयार केले जाते, हवेत कसे उडते यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन प्रणव चित्ते यांनी केले़ यावेळी चित्ते यांनी विद्यार्थ्यांना थ्री इडिएट चित्रपटामध्ये वापरण्यात आलेले क्वॉड्रारोटर दाखवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचे काम केले़ लोकमत बालविकास मंचच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले़ (प्रतिनिधी)
१४ हजार मुलांनी अनुभवला क्वॉड्रारोटरचा थरार !
By admin | Updated: August 6, 2014 02:21 IST