शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम पूर्ण झाले तरी वाळूज लिंक रोड अजूनही बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:33 IST

औरंगाबाद- पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने लिंक रोड मार्गावरील वाहतूक ७ महिन्यापांसून बंद करण्यात आली होती. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण होऊनही लिंक रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात न आल्यामुळे वाहनधारकांना मोठा फेरा मारून ये-जा करावी लागत आहे.

ठळक मुद्देपैठण रस्त्याचे काम चालू असताना लिंक रोडमार्गे पैठण व शहराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आला होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रेल्वेस्टेशनचे कांचनवाडीपर्यंत सिमेंटीकरणाचे काम आठवडाभरापूर्वी उरकले आहे. वाहतूक शाखेकडून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास टाळाटाळ केली जात आहे

औरंगाबाद : औरंगाबाद- पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने लिंक रोड मार्गावरील वाहतूक ७ महिन्यापांसून बंद करण्यात आली होती. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण होऊनही लिंक रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात न आल्यामुळे वाहनधारकांना मोठा फेरा मारून ये-जा करावी लागत आहे.

पैठण रस्त्याचे काम चालू असताना लिंक रोडमार्गे पैठण व शहराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक शाखेशी तोंडी चर्चा केल्यानंतर हा रस्ता बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रेल्वेस्टेशनचे कांचनवाडीपर्यंत सिमेंटीकरणाचे काम आठवडाभरापूर्वी उरकले आहे. त्यामुळे लिंक रोड चौफुलीवरून होणारी वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदिल दाखविला होता. मात्र, वाहतूक शाखेकडून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे वाळूज औद्योगिकनगरी तसेच मुंबई-नाशिककडून येणार्‍या वाहनधारकांना नगर नाकामार्गे ये-जा करावी लागत आहे.

रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नसल्यामुळे भाजपचे प्रशांत नांदेडकर, उल्हास पाटील यांनी आज मंगळवारी लिंक रोड चौफुलीवर तैनात वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाशिवाय हा रोड खुला केला जाणार नसल्याचे वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी या पदाधिका-यांना सांगितले. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता कैलास गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील, असे सांगत अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.

टोल नाक्याचे कनेक्शनलिंक रोड सात महिन्यांपासून बंद असल्यामुळे दररोज हजारो जड वाहनांना नगर नाकामार्गे ये-जा करावी लागत आहे. मालाची ने-आण करणार्‍या जड वाहनधारकांकडून गोलवाडी पथकर नाक्यावर टोल टॅक्सची वसुली करण्यात येते. गत सहा-सात महिन्यांत या टोल नाक्यावरील धंदा चांगलच वाढला आहे. लिंक रोड वाहतुकीसाठी खुला झाल्यास जड वाहनांची ये-जा बंद होईल. यामुळे पथकरचालक वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना हाताशी धरून लिंक रोड वाहतुकीसाठी खुला करण्यास आडकाठी आणत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.