शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

‘त्या’ मालमत्ता हस्तगत करणार

By admin | Updated: December 24, 2015 00:03 IST

औरंंंगाबाद : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या किती मालमत्ता आहेत, या बद्दल प्रशासन अनभिज्ञ आहे.

औरंंंगाबाद : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या किती मालमत्ता आहेत, या बद्दल प्रशासन अनभिज्ञ आहे. अनेक मालमत्तांचे कागदपत्रेदेखील जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाहीत, अशी खंत सदस्यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जि. प. च्या अतिक्रमित मालमत्ता हस्तगत करणे व मालमत्तांची कागदपत्रे जमा करण्यावर आम्ही भर दिला आहे, असे निवेदन केले. जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दिनकर पवार, बांधकाम सभापती संतोष जाधव, शिक्षण सभापती विनोद तांबे, समाजकल्याण सभापती शीला चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांची उपस्थिती होती. आजच्या बैठकीत जि. प. च्या मालमत्तांचा विषय गाजला. सदस्य रामदास पालोदकर यांनी मुद्दा मांडला की, सिल्लोड तालुक्यातील खेडी येथे शाळेच्या जागेवर तेथील एका शेतकऱ्याने दावा केला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले, अशा प्रकारच्या किती मालमत्तांची प्रकरणे न्यायालयात आहेत. किती प्रकरणे निकाली निघाली आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती करत पालोदकर यांनी सभागृहाला धारेवर धरले. पालोदकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल खुलासा करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा म्हणाले की, जिल्ह्यात १ हजार २० मालमत्तांची कागदपत्रे हस्तगत करण्यात आलेली आहेत. १२६० मालमत्तांची कागदपत्रेही हस्तगत करू. दिल्ली गेट येथील जि.प.च्या जागेवर असलेल्या पेट्रोलपंपाबाबतची केस पुन्हा न्यायालयात ‘रिओपन’ करणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर काय कारवाई केली, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला तेव्हा शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात ३१ अनधिकृत शाळा होत्या त्यापैकी २२ शाळा बंद झाल्या असून ४ शाळांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातील एक शाळा ३० एप्रिल २०१६ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.