शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांना देशात बदल घडवायचाय: संजय सिरसाट

By बापू सोळुंके | Updated: January 22, 2024 19:55 IST

रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही आमदार सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली

छत्रपती संभाजीनगर: ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, ते देशाची सत्ता बदलायला निघाल्याची खरमरीत टीका शिवसेना प्रवक्ता आ. संजय सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर येथे पत्रकारांशी बोलताना केली. राम मंदीराचा निवडणूकीत आम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या पोटात का दुखतं, जो काम करतोय, त्यांनी फायदा घेतल्यास गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आ. सिरसाट म्हणाले की, आज अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यासह सर्वजण येत्या काही दिवसांत अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहाेत. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहे. तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिक मध्ये आरती करत आहेत. स्वतःला विद्ववान समजणारे आता प्रभू रामावर प्रश्न विचारत आहेत. रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही सिरसाट यांनी  पक्षप्रमुख ठाकरेंवर केला. स्वर्गीय बाळासाहेबांची मंदिराबद्दल भूमिका आणि योगदान नाकारता येणार नाही. पण यांना वाटतं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं ,पण आम्ही यांना का महत्व द्यायचं? हा इव्हेंट नाही, तर आनंदोत्सव असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

संजय राऊत आता गांधी अन् पवार यांचेही प्रवक्तेघरातली माणसं यांनी ठेवली नाही, मुंबईत पाणी शिरलं तेव्हा बाळासाहेबांना एकटं सोडून पळाले, हे दलाल आहेत. यांनी साहेबांना विकायला पण कमी केलं नसतं. खा. संजय राऊत हे सतत शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर लक्ष ठेवून असतात. आता ते उबाठा पक्षासोबतच गांधी आणि पवार यांचेही प्रवक्ते बनल्याची टीका त्यांनी केली. देशात बदल करण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी घर सांभाळावे, यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही.

टिकणाऱ्या आरक्षणास वेळ लागतोमनोज जरांगे हे लाखो जनतेसह मुंबईला निघाले या आंदोलनाकडे सरकार का दुर्लक्ष करते, या प्रश्नाचे उत्तर देताना आ. सिरसाट म्हणाले, जरांगे यांना जनतेचा पाठिंबा आहे.  पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी आरक्षण देऊ असे सांगितले आहे. त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. जरांगे यांच्यासोबत लहान मुले, वृद्ध आहेत, त्यांची काळजी घ्यावी असे आमचे आवाहन आहे. आज आरक्षण दिलं तर लोक न्यायालयात जातील म्हणून आम्ही कायदेशीर आणि टीकणारे आरक्षण देणार आहे, त्यामुळे वेळ लागत असल्याचे सिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना