औरंगाबाद : पोलिसांवर दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या १२ विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांंना सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी शनिवारी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला. राज्य विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मोर्चा काढला होता. हा मोर्चा आमखास मैदानाजवळ अडविण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्या शिक्षकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी चार अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून लाठीहल्ला केला होता. दगडफेक करणाऱ्या ५९ जणांना पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. त्यापैकी १२ शिक्षकांना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर ४७ शिक्षकांची न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. १० आॅक्टोबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. जी. एम. शेख यांनी वरील १२ शिक्षकांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती व रात्री उशिरा त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती.न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात असलेले (पान २ वर)
‘त्या’ बारा शिक्षकांना नियमित जामीन मंजूर
By admin | Updated: October 16, 2016 01:15 IST