शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

‘त्या’ पाच आरोपींची न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: November 17, 2015 00:28 IST

जालना : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते

जालना : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते. या पाच गुन्हेगारांच्या सहाव्या साथीदारास गुन्हे शाखेने बीड येथून रविवारी अटक केली. दरम्यान, त्या पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.जालना येथील नवीन मोढ्यातील आडत व्यापारी आशीष आनंद सेठिया यांच्या जवळील मोठी रक्कम लुटून त्यांचे अपहरण करण्याचा बेत बीड येथील पाच अट्टल गुन्हेगारांनी रचला होता. ते ९ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नवीन मोंढा ते भोकरदन नाका रस्त्यावर टाटासुमो वाहनात दबा धरून बसलेल्या या आरोपींना वरकड हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत सापळा लावून जेरबंद करण्यात आले होते. त्यात अन्वर खान मिर्झा खान उर्फ गुजर (३२ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी बीड), शेख वसीम शेख वजीर (२६ रा. ढगे कॉलनी,अशोकनगर बीड), सय्यद नासेर सय्यद महेबूब (२४ रा.बालेपीर भरतभूषण क्षीरसागर नगर,बीड), सय्यद अहमद सय्यद महेबुब (२५ रा. संजयनगर गॅस गोडावून समोर जालना), व शेख उबेद शेख बाबु (२५ बागल नाक्या जवळ बीड) या पाच जणांना समावेश होता. त्यांच्या ताब्यातून टाटासुमो, एक तलवार, एक चाकु, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने या आरोपींना सोमवारी पून्हा न्यायालयात हजर केले असता त्याना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी बीड येथून आणखी एका आरोपीस अटक करण्यात आले आहे. अलिम अहेमद जलील अहेमद असे त्याचे नाव आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. अनंत कुलकर्णी, सपोनि विनोद इज्जपवार कर्मचारी हरी राठोड, सचिन चौधरी, भालचंद्र गिरी, वैभव कुरेवाड, रामेश्वर बघाटे, हिरामन फलटनकर, सदाशिव राठोड, सॅम्यूअल कांबळे, विलास चेके, समाधान तलंग्रे, विष्णू कोरडे, प्रशांत देशमुख आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)