शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

 यंदा लाडके दैवत बाप्पाचे आगमन लांबले; १९ दिवस उशिराने होणार गणरायाचे आगमन

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 22, 2023 15:46 IST

मागील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशी विनंती व जयघोष मागील वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक गणेशभक्तांनी गणपती बाप्पाला पाहून केला होता. मात्र, यंदा महाराष्ट्राचे लाडके दैवत गणाधिपतीचे आगमन मागील वर्षीपेक्षा तब्बल १९ दिवस उशिराने होणार आहे. यंदा मूर्ती तयार करण्यासाठी अधिकचा वेळ मिळाल्याने मूर्तिकारही मूर्ती घडविण्यासाठी जोमाने कामाला लागले आहे. म्हणूनच तर शहरात दीड लाखापेक्षा अधिक मूर्ती तयार केल्या जात आहे.

गणपती बाप्पाचे कधी होणार आगमनमागील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला होता. मात्र, यंदा १९ सप्टेंबर २०२३ या दिवशी गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाला सुरुवात होईल. २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. १० दिवस गणरायाचा मुक्काम असणार आहे. पण यासाठी गणेशभक्तांना गणेशोत्सवाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

का होणार उशिरा बाप्पाचे आगमनयंदा ‘अधिक मास’ आला आहे. १८ जुलैपासून अधिक मासाला सुरुवात होईल व १६ ऑगस्टला अधिक मासाची सांगता होईल. यामुळे गणरायाचे आगमन १९ दिवस लांबले आहे.

मूर्तिकारांच्या हातात अजून ८८ दिवसगणेशोत्सव सुरु होण्यासाठी अजून ८८ दिवस बाकी आहेत. मूर्तिकारांनी मार्च महिन्यापासूनच मूर्ती घडविण्याची लगबग सुरु केली आहे. जसजसे दिवस जात आहे तसतसे मूर्ती बनविण्याचा वेग वाढत आहे. सध्या मूर्ती बनविणे व त्याचे फिनिशिंग करणे सुरु आहे. ५० दिवसांनंतर रंगरंगोटीचे काम सुरु होईल. यासाठी मूर्तिकारांचे कुटुंबच कामाला लागले आहे.

गणेशाची साकारताहेत वेगवेगळी रुपेमूर्तिकार सदैव गणपती बाप्पा विविध रुपात साकारण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदा अधिक मासामुळे जास्तीचा वेळ मिळाला आहे. यामुळे बाप्पाच्या नवीन स्वरुपातील मूर्ती घडविण्यासाठी मोठा वाव मिळाला आहे. या संधीचा आम्ही फायदा घेत आहोत. भाविकांना नवीन मूर्ती यावेळी दिसतील.- दिनेश बगले, मूर्तिकार

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक