शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

तिसर्‍या निवडणुकीत गुरुजींना धक्का

By admin | Updated: May 17, 2014 00:21 IST

लातूर : अत्यंत सामान्य घरातून पुढे आलेल्या व शिक्षक म्हणून नावारुपाला आलेले काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे हे तसे अपघातानेच राजकारणात आले़

लातूर : अत्यंत सामान्य घरातून पुढे आलेल्या व शिक्षक म्हणून नावारुपाला आलेले काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे हे तसे अपघातानेच राजकारणात आले़ निवृत्तीनंतर वकिलीचा मानस असताना अचानक स्व़विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार १९९२ साली पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली अन् ती जिंकलीही़ त्यानंतर २०१२ मध्ये लढविलेल्या दुसर्‍या निवडणुकीतही ते विजयी झाले़ मात्र, संसदीय निवडणुकीत त्यां चा पराभव झाला अन् विजयाची हॅट्ट्रीक हुकली़ उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर जन्मभूमी तर गंगापूर कर्मभूमी़ प्रतिकूल परिस्थितीत सातवीपर्यंचे शिक्षण येणेगुरातच घेतले़ आई-वडील मोलमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवीत़ परंतु, शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर बनसोडे सोलापुरात आले़ तेथे ते संताच्या बोर्डिंगमध्ये राहून डॉ़बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये मॅट्रीकपर्यंत शिकले़ ११वी ते एम़ए़ पर्यंतचे शिक्षण त्यांनी सोलापुरातल्या दयांनद महाविद्यालयात घेतले़ एम़ए़ चे शुल्क भरताना त्यांच्या वडिलांनी घरातील एकमेव पितळी घागर विकल्याची आठवण गुरुजी आजही सांगतात़ वकिलीचे स्वप्न पाहिलेल्या गुरुजींना त्यांचे वडील गुंडेराव हा लबाडीचा व्यवसाय असल्याचे सांगून दुसरे कोणतेही शिक्षण घेण्याचा सल्ला देत होते़ त्यानुसार दत्तात्रय बनसोडे यांनी एम़ए़ केले़ पुढे दोन वर्षे त्यांनी लातुरातील यशवंत विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली़ त्यानंतर लातूरजवळील गंगापूर येथे जयकिसान विद्यालयात १९७१ला रुजू झाले़ मुख्याध्यापकही झाले़ दरम्यान त्यांना काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा सहवास लाभला़ १९९२ साली त्यांच्याच सूचनेवरुन ध्यानीमनी नसतानाही गुरुजींना जिल्हा परिषदेला थांबावे लागले़ चांगल्या मतांनी विजयीही झाले़ निवृत्तीनंतर दुसर्‍यांदा संधी मिळाली़ यावेळी ते विजयासह जि़प़अध्यक्षही बनले़ परंतु, लोकसभेच्या रणांगणात उतरुन कारकिर्दीतील विजयाची हॅट्ट्रीक साधण्यात मात्र ते अयशस्वी ठरले़