शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनावर पोट भरणाऱ्या दीनदुबळ्यांचा विचार करा; निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:40 IST

लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा

ठळक मुद्देपर्यटन स्थळे मागील ८  महिन्यांपासून बंद अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत.

औरंगाबाद : पर्यटन स्थळांच्या परिसरात काम करून पर्यटनाद्वारे रोजीरोटी भागविणारे हजारो लोक  अजिंठा-वेरूळ परिसरात आहेत. आठ महिन्यांपासून या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या हजारो दीनदुबळ्यांचा विचार करून आणि कोरोनाच्या दृष्टीने संरक्षक अटी घालून पर्यटन स्थळे सुरू करावीत, अशी मागणी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. पर्यटन स्थळांवर अवलंबून असणारे हजारो व्यावसायिक आंदोलनाकडे वळतील, अशी वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये, असा इशाराही महानोर यांनी शुक्रवार, दि. २० रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

निवेदनात महानोर म्हणाले की, भारताचे वैभव असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्याच्या परिसरात मी राहत असून, महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांशी माझे दृढ नाते आहे. ही सर्व पर्यटन स्थळे मागील ८  महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटन स्थळांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांना आता कोणताही  रोजगार राहिलेला नाही. हातावर पोट असल्याने अन्य  कोणताही व्यवसाय या लोकांना ठाऊक नाही, तसेच या लोकांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. उपाशी, अर्धपाेटी जगून ही माणसे भरडली जात आहेत. हे अत्यंत अस्वस्थ करणारे वास्तव असून, याचा विचार करून पर्यटन स्थळे सुरू करावीत. अजिंठा गाईड असोसिएशन फॉर सोशल वेलफेअरचे अध्यक्ष शेख अबरार यांच्याकडे महानोर यांनी निवेदनाची प्रत सुपूर्त केली. या लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा, असेही महानोर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद