शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दुचाकी चोरणाऱ्या तिघांना कोठडी

By admin | Updated: April 23, 2015 00:46 IST

उस्मानाबाद : शहरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी मंगळवारी पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : शहरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी मंगळवारी पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या तिघांनाही एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हाडपसर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात तिघांना अटक केली होती. याच लोकांनी उस्मानाबादसह इतर ठिकाणाहून दुचाकींचीही चोरी केल्याचे हाडपसर पोलिसांच्या तपासादरम्यान उघडकीस आले. यावरून त्यांनी काही दुचाकीही जप्त केल्या. ही माहिती समजल्यानंतर उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने न्यायालयाच्या परवानगीनंतर पुणे येथे जावून राजेश ऊर्फ राजा शंकर राठोड (वय २३, रा. पश्चिम तांडा, जेवळी, ता. लोहारा), चेतन अशोक बेलुरे (वय १९, रा. हाडपसर, पुणे) आणि अनंता मनोज भडकवाड (रा. तालुका पुरंदर, जि. पुणे) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून उस्मानाबाद शहरातील समता नगर भागातून चोरीस गेलेली डांगे यांची एक दुचाकीही जप्त करण्यात आली.या तिघांनाही बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या या तिघांकडून चोरीस गेलेल्या आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता असून, या अनुषंगाने शहरातून दुचाकी चोरीस गेलेल्या नागरिकांनी शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या घटनेचे तपासीक हवालदार एस. डी. सूर्यवंशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)