आशाबाई शंकर हाळनोर (५०) या त्यांची मुलगी दीपालीसह हनुमाननगर येथे राहतात. सोमवारी रात्री त्यांनी घराच्या गेटला कुलूप लावले आणि घराचे दार उघडे ठेवून दीपालीसह त्या झोपल्या. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या उशाला गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याची पोत ठेवली. यासोबतच त्यांनी घरात पर्समध्ये रोख ३० हजार रुपये ठेवले होते. मध्यरात्रीनंतर २.४५ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांच्या उशाखाली ठेवलेली सोन्याची पोत आणि पर्समधील ३० हजारांची रोकड चोरून नेली. चोर घरातून पळून जात असल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. या घटनेची माहिती त्यांनी लगेच पोलिसांना कळविली. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हाळनोर यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार एल. बी. हिंगे तपास करीत आहेत.
चौकट
उघड्या घरातून ऐवज पळविण्याच्या घटना वाढल्या
उन्हाळ्यात उकाडा असह्य होत असल्यामुळे लोक रात्री घराचे दार उघडे ठेवून झोपतात. ही संधी साधून चोरटे उघड्या घराला लक्ष्य बनवित आहेत. २७ एप्रिल रोजी सिडकोतील एका घरातून चोरट्यांनी ८ तोळ्यांचे दागिने लंपास केले. याविषयी सिडको ठाण्यात नोंद आहे. या गुन्ह्याचा उलगडा अद्याप झाला नाही. मुकुंदवाडी अंबिकानगरमधील कैलास हानवते यांच्या उघड्या घरातून ३९ हजारांच्या मोबाईलची चोरी झाली.