सिल्लोड : तालुक्यातील भवन येथील बँक आॅफ बडोदा रविवारी (दि.१५) रात्री फोडण्याचा प्रयत्न झाला. बँके च्या पाठीमागील भिंतीला बोगदा पाडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. एक तिजोरी फोडली. दुसरी फोडत असताना गस्तीवरील पोलीस वाहनाच्या सायरनच्या आवाजाला घाबरून चोरटे पळाले. यामुळे बँके त असलेले १२ लाख ६० हजार रुपये वाचले.सिल्लोड तालुक्यातील भवन येथील बँक आॅफ बडोदा या शाखेतील कर्मचाऱ्यांनी शनिवारी बँक रकमेचा पूर्ण हिशोब करून रोख रक्कम १२ लाख ६० हजार रुपये बँके च्या तिजोरीत ठेवले व बँक नियमित वेळेत बंद करून निघून गेले.रविवारी (दि. १५) बँकबंद होती. ही संधी साधून चोरट्यांनी रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान बँके च्या पाठीमागे असलेल्या सिद्धेश्वर हायस्कूलमधून प्रवेश करून बँके च्या पाठीमागील भिंतीला बोगदा पाडून आत प्रवेश केला.बँके च्या तिजोरीपर्यंत पोहोचले व तिजोरी गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. या बँके त २ तिजोऱ्या आहेत. पहिली तिजोरी तोरट्यांनी फोडली; पण त्यात केवळ एटीएम पासवर्ड व महत्त्वाची कागदपत्रे होती. यामुळे चोरट्यांनी दुसऱ्या तिजोरीकडे मोर्चा वळवला. तिला फोडताना चोरट्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज आल्याने चोरट्यांनी तिजोरी जशीच्या तशी सोडून धूम ठोकली.
चोरट्यांनी फोडली भवन येथील बँक
By admin | Updated: May 17, 2016 00:36 IST