शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे बनले हायटेक; पोलिसांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:25 IST

एखाद्या घरी चोरी, घरफोडी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. गुन्हा करण्याची पद्धत, चोरट्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे, या आधारे चोरी कोणत्या चोरट्यांनी केली असेल, याचा अंदाज बांधतात आणि चोरापर्यंत पोहोचतात. आता मात्र चोरटे वेगवेगळ्या पद्धतीने चो-या करतात आणि पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी हायटेक उपकरणांचा वापर करतात. हायटेक झालेल्या चोरट्यांमुळे पोलिसांना प्रसारमाध्यमे आणि वरिष्ठांच्या टीकेचे धनी व्हावे लागते.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एखाद्या घरी चोरी, घरफोडी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. गुन्हा करण्याची पद्धत, चोरट्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे, या आधारे चोरी कोणत्या चोरट्यांनी केली असेल, याचा अंदाज बांधतात आणि चोरापर्यंत पोहोचतात. आता मात्र चोरटे वेगवेगळ्या पद्धतीने चो-या करतात आणि पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी हायटेक उपकरणांचा वापर करतात. हायटेक झालेल्या चोरट्यांमुळे पोलिसांना प्रसारमाध्यमे आणि वरिष्ठांच्या टीकेचे धनी व्हावे लागते.गुन्हे शाखेने नुक तीच खिडकी गँग पकडली. तेव्हा या गँगने शहरातील अनेक बंगले आणि घरे फोडून धुमाकूळ घातल्याचे चौकशीत समोर आले. बीड, अहमदनगर येथून ही गँग कारने शहरात यायची आणि घरफोड्या करून सहीसलामत परत जायची. पोलीस मात्र त्यांच्या रेकॉर्डवरील दुसºयाच चोरट्यांना पकडून त्यांच्याकडे विचारपूस करीत. चोरट्यांची ही टोळी गुन्हा करताना हायटेक उपकरणाचा वापर करी. परिणामी ते पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत. त्यांच्याकडे आढळलेली मायक्रो बॅटरी पाहून पोलिसांना धक्काच बसला. दोन बोटांच्या चिमटीत पकडून ठेवता येईल अशी ही बॅटरी.या बॅटरीचा कुलूप उघडण्यासाठी अथवा खिडकीचे स्क्रू काढण्यासाठी ते वापर करीत. अंधारात या बॅटरीचा प्रकाश काजव्यासारखा भासतो. यामुळे ती बॅटरी असावी, असा कोणाला संशयही येत नाही. त्यांनी वापरलेला स्क्रू ड्रायव्हर, चिमटा, छोटी टॉमी आणि हॅण्डग्लोज असे साहित्य खिशात बसतील असे होते. बोटांचे ठसे पोलिसांना घटनास्थळी मिळू नयेत, यासाठी चोरटे हॅण्डग्लोज वापरतात.एवढेच नव्हे तर मोबाईल लोकेशनवरून पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, यामुळे आता अनेक चोरट्यांनी मोबाइल वापरणेही बंद केले. औरंगाबादसारख्या शहरात सीसीटीव्हीत कैद होण्याच्या भीतीपोटी चोरटे चेहºयाला मास्क लावतात. पकडल्या जाऊ नये म्हणून चोरटे रिक्षाचा वापर करतात.पोलीस यंत्रणाही थक्कचोरट्यांप्रमाणे सरकारी नोकरींची परीक्षा देताना गुन्हेगार आता हायटेक उपकरणांचा वापर करताना दिसतात. मानवी त्वचेच्या रंगाचे मायक्रो ब्लू टूथ आॅनलाइन बाजारात सहज मिळते. गत महिन्यात मुकुंदवाडी पोलिसांनी पकडलेल्या हायटेक कॉपी प्रकरणातील आरोपींनी प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी आणि उत्तरे पाठविण्यासाठी वापरलेले मायक्रो मोबाइल फोन आणि ब्लू टूथ पाहून पोलीस यंत्रणा थक्क झाली. यासोबत सायबर गुन्हेगारही सामान्यांना फसविण्यासाठी नवीन नवीन फंडे वापरत असतात. बँक अधिकारी बोलत असल्याची थाप मारून सायबर गुन्हेगार सामान्यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये पळवितात. क ाही प्रकरणात लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून गुन्हेगार त्यांच्या बँक खात्यात रकमा भरण्यास सांगून फसवितात.