शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कंधारात जलशुद्धीकरण यंत्राचे ६९ प्रस्ताव झाले दाखल

By admin | Updated: June 24, 2014 00:41 IST

प्रा. गंगाधर तोगरे, कंधार अशुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक रोगाचा सामना करावा लागतो़ त्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यासाठी

प्रा. गंगाधर तोगरे, कंधारअशुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक रोगाचा सामना करावा लागतो़ त्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यासाठी गटविकास अधिकारी ए़ एस़ कदम यांनी मागील महिन्यात संकल्प सोडला़ त्याला ग्रा़ पं़ नी सकारात्मक प्रतिसाद देत ६९ प्रस्ताव सादर झाले आहेत़ त्यातून रोगराई हद्दपार होवून गावाचे आरोग्य बळकट होण्यास वाव मिळणार आहे़तालुक्यात ग्रामपंचायतीची संख्या ११६ आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे मोठे दिवास्वप्न ठरते़ तहान भागविण्यासाठी विहीर, विंधन विहिरीच्या पाण्याचा सर्रासपणे वापर करावा लागतो़ पाण्याचा अशुद्ध व दूषितपणा आरोग्य निरोगीपणाला मोठा अडथळा ठरतो़ दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड, घसादुखी, त्वचाविकार, विषाणुजन्य आजाराचा धोका असतो़ जमिनीतील खोलवरचे पाणी पिण्यासाठी वापरल्यास फ्लोरोसीस आजार होण्याची शक्यता असते़ कारण त्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक असते़ जास्त काळ असे पाणी सेवन केल्यास सुरुवातीला दात वाढ व आकारावर त्याचा परिणाम होतो़ हाडात हळूवारपणे फ्लोराईड जमा होवून नानाविध आरोग्य समस्येचा सामना करावा लागतो़ त्यासाठी गटविकास अधिकारी यांनी निरोगी आरोग्याचा संकल्प सोडला़शासनाच्या विविध योजनेतून विविध विकासासाठी मोठा निधी येतो़ त्यातून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते़ त्यामुळे आलेगाव गावात ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचा प्रस्ताव दाखल झाला आहे़ आंबुलगा-३ लाख, औराळ-३ लाख, बाभूळगाव -३ लाख, बाचोटी- ३ लाख, भूकमारी- ३ लाख, भुत्याचीवाडी - ३ लाख, बिजेवाडी- ३ लाख, बोळका - ३ लाख, बोरी (खु़)-३ लाख, चिंचोली (पक़़)-३ लाख, चौकी धर्मापुरी-३ लाख, दाताळा, धानोरा कौठा, दिग्रस बु़, गांधीनगर, गंगनबीड, गऊळ, घोडज, घागरदरा, घुबडवाडी, गोगदरी, गोणार, गुंटूर, हाडोळी (ब्ऱ), हाळदा, हटक्याळ, हिप्परगा (शहा), इमामवाडी, जाकापूर, जंगमवाडी, कल्हाळी, कौठा, खंडगाव (ह़), कोटबाजार, लाडका, लालवाडी, महालिंगी, मजरे धर्मापुरी, मंगलसांगवी, मरशिवणी, मसलगा, मुंडेवाडी, नागलगाव, नंदनशिवणी, नंदनवन, नारनाळी, पानभोसी, पांगरा, रूई, पानशेवडी, पाताळगंगा, पेठवडज, पोखर्णी, रहाटी, राऊतखेडा, संगुचीवाडी, सावरगाव (नि़), शिराढोण, शिरसी बु़, शिरसी खु़, शिरूर, तेलूर, उमरगा (खो), उमरज, वहाद, वाखरड, वरवंंट व येलूर या सर्व ग्रामपंचायतीचे अंदाजित ३ लाख रुपये किंमतीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़२०१४-१५ च्या बीआरजीएफ जिल्हा वार्षिक नियोजनातून जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार आहेत़ हा मिळणारा निधी काही गावात कमी मिळणार आहे़ तरी अन्य निधीतून कसा मिळवला जातो आणि जलशुद्धीकरणाचा मार्ग मोकळा कसा होतो हे काही दिवसात कळणार आहे़ काटकळंबा गावात बसवलेले यंत्र नागरिकांचा उत्साह वाढविणारे ठरत आहे़ त्यामुळे ६९ गावांत आरोग्यवाढीस चालना मिळेल़